जाडेजानं शेअर केला रुग्णालयातला फोटो

भारताच्या दुसऱ्या डावात त्याने 30 धावांची खेळीही केली होती. पण ...
Ravindra Jadeja
Ravindra Jadeja Instagram

India tour of England, 2021 : भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. लीड्सच्या मैदानातील कसोटी सामन्यानंतर गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यामुळे तो चौथ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता निर्माण झालीये. लीड्सच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 76 धावा आणि डावाने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करतावेळी रविंद्र जडेजाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानात खेळतानाही दिसला. भारताच्या दुसऱ्या डावात त्याने 30 धावांची खेळीही केली होती. पण सामन्यानंतर त्याने स्कॅनिंगसाठी रुग्णालय गाठले.

रविद्र जाडेजानं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. ज्यात तो रुग्णालयातील कपड्यांत दिसतोय. हे ठिकाण चांगले नाही, असे म्हणत त्याने आपली भावना व्यक्त केलीये. त्याची प्रकृती फार चिंताजनक नसली तरी उर्वरित दोन सामन्यांना त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठिण आहे. पहिल्या तिन्ही कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली. पण त्याला विशेष छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे त्याच्या जागेवर आर अश्विनला संधी मिळू शकते.

Ravindra Jadeja
पंतचा पत्ता होणार कट? 'विराट' पराभवानंतर कोहलीची प्रतिक्रिया

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 2 सप्टेंबरपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. 30 जूनला भारतीय संघ लंडनला रवाना होणार आहे. कसोटी सामन्यापूर्वी अश्विनने कांउटी क्रिकेटमध्ये सरेकडून प्रतिनिधीत्व केले असून यात त्याने 6 विकेट घेतल्या आहेत. जडेजाला तीन कसोटी सामन्यात केवळ दोन विकेट मिळवण्यात यश आले होते.

Ravindra Jadeja
Paralympics: PM मोदींनी चंदेरी गर्लला कॉल करुन दिल्या शुभेच्छा!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एकमेकांना कांटे की टक्कर देत आहेत. नाँटिंघमच्या मैदानातील पहिल्या सामना अनिर्णित राहिल्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानात टीम इंडियाने दिमाखदार विजय नोंदवत मालिकेत आघाडी घेतली होती. त्यानंतर लीड्सच्या मैदानात यजमान इंग्लंडने मालिकेत बरोबरी साधली. या सामन्यात भारतीय संघाला मोठ्या पराभवाला सामना करावा लागला. उर्वरित दोन कसोटी सामन्यातील दमदार कामगिरीसह मालिका निकाली काढण्यात दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com