India vs Australia Nagpur Test Pitch sakal
क्रीडा

IND vs AUS: नागपूरची खेळपट्टी पाहताच कांगारूंच्या कळपात झाला भूकंप; क्रिकेट तज्ञांने केले गंभीर आरोप

Kiran Mahanavar

India vs Australia Nagpur Test Pitch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना गुरुवारपासून नागपुरात खेळल्या जाईल. ही चार सामन्यांची कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाची आहे.

पहिल्या कसोटीसाठी नागपूरची खेळपट्टी पाहून कांगारूंकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. मंगळवारी जामठा स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफने जुन्या पद्धतीनुसार काही खास फाइन-ट्यूनिंग केले. संपूर्ण पृष्ठभागाला प्रथम पाणी देण्यात आले, त्यानंतरच खेळपट्टीच्या मध्यभागी एक रोलर चालविण्यात आला आणि डाव्या हाताच्या फलंदाजाच्या लेग स्टंपच्या बाहेर अतिरिक्त पाणी ओतले गेले.

ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा-जेव्हा भारतात आला आहे, तेव्हा त्याच्या फलंदाजांची फिरकीविरुद्ध कसोटी लागली आहे. अशा स्थितीत 4 सामन्यांमध्ये फिरकी विकेट मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे खेळपट्टीबाबत राडा झाला आहे. माजी कांगारू वेगवान गोलंदाज जेसन गिलीस्पी म्हणाले की, क्युरेटर्स भारतीय संघाला अनुकूल अशी खेळपट्टी तयार करत आहेत.

नागपूरच्या खेळपट्टीबाबत जेसन गिलेस्पी सेन डब्ल्यूए ब्रेकफास्ट शोमध्ये म्हणाला, “मला वाटते की भारतीय क्युरेटर्स भारताला फायदा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना वाटते की फिरकीची भूमिका मोठी असेल आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची सर्वोत्तम संधी त्यांच्या ताकदीनुसार खेळण्याची असेल."

माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ सायमन ओडोनेल म्हणाले की, “आयसीसीने हस्तक्षेप करावा आणि त्यांना हे योग्य वाटत नसेल तर त्याबद्दल काहीतरी करावे. आयसीसी रेफरी असेल, पण जेव्हा भारताचा विचार केला जातो तेव्हा खूप चर्चा होते आणि काहीही होताना दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT