IND vs AUS: 'मी त्याच्या कानाखाली जाळ काढेल...' टीम इंडियाच्या या खेळाडूवर देव संतापले

जाणून घ्या कपिल देव असं का म्हणाले?
Kapil Dev
Kapil Dev Sakal

Kapil Dev : भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आपल्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. टीम इंडियाच्या एका खेळाडूवर भारताचा माजी कर्णधार कपिल देव अचानक भडकले. त्यांच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. 1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंत यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे.

Kapil Dev
IND vs AUS: कांगारू संघाच्या अडचणीत वाढ! पहिली कसोटी खेळण्याआधीच तिसरा धक्का

कपिल देव यांनी त्यांच्या एका शब्दाने अचानक क्रिकेट विश्वात दहशत निर्माण केली आहे. टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर प्रतिक्रिया देताना कपिल देव एका टीव्ही चॅनल्स बोलताना म्हणाले, 'ऋषभ पंत लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जेव्हा तो बरा होईल तेव्हा मी जाऊन त्याच्या कानाखाली जाळ काढेल, कारण त्याच्या दुखापतीने संपूर्ण संघाचे नियोजन खराब झाले आहे. मग असा संतापही येतो की आजकालची तरुण मुलं अशा चुका का करतात?.

Kapil Dev
IND vs AUS: नागपूर पोलीस दलात खळबळ! विराटचा मोबाईल हरवला की कुणी चोरला?

कपिल देव पुढे म्हणाले, 'ऋषभ पंतला देव बरे करो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्यापासून नागपुरात खेळल्या जाणार आहे. ऋषभ पंतची अनुपस्थिती ही टीम इंडियासाठी मोठी हानी आहे, कारण ऋषभ पंत हा कसोटी फॉरमॅटमध्ये एक जबरदस्त यष्टीरक्षक असण्यासोबतच एक अतिशय धोकादायक फलंदाज आहे. ऋषभ पंत कसोटी फॉरमॅटमध्ये जलद धावा करतो आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या महत्त्वाच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला त्याची उणीव भासेल.

Kapil Dev
पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! आफ्रिदी सापडला भ्रष्टाचारात, PCB ने घातली बंदी

ऋषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी सकाळी कार अपघाताचा बळी ठरला. तो नवी दिल्लीहून त्याच्या मूळ गावी रुरकीला जात होता. डेहराडून हायवेवर ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली आणि आग लागली. ऋषभ पंतच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे, गुडघ्याचा लिगामेंट फाटला आहे, तसेच उजव्या हाताच्या मनगटावर, घोट्याला आणि पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. ऋषभ पंत आता हळूहळू दुखापतीतून सावरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com