ind vs aus shubman gill 
क्रीडा

Shubman Gill : IPL चे मैदान गाजवलेला शुभमन गिल WTC फायनलमध्ये फक्त 13 धावांवर क्लिन बोल्ड - Video

Kiran Mahanavar

Ind vs Aus Shubman Gill WTC Final 2023 : भारतीय युवा स्टार शुभमन गिलने गेल्या काही काळापासून क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवले आहे. आयपीएल 2023 मध्ये त्याने 850 हून अधिक धावा केल्या, त्यानंतर तो चर्चेचा विषयही बनला. आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीनंतर इतक्या धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.

पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शुभमन गिलची बॅट फ्लॉप ठरली 12 धावांवर क्लीन बोल्ड झाला. शुभमन गिलची ही विकेट भारतासाठी सर्वात धक्कादायक होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शुभमन गिल केवळ 13 धावा करून स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला होता. शुभमन गिल याआधी उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि अनेक चाहत्यांनी या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतासाठी चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा केली होती. पण सहाव्या षटकात गिलने स्कॉट बोलंडच्या लाईन-लेन्थवर फटकेबाजी केली आणि बोलंडने क्लीन बोल्ड केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने 121.3 षटकात सर्वबाद 469 धावा केल्या. संघासाठी स्टीव्ह स्मिथने 121 आणि ट्रॅव्हिस हेडने 163 धावांची शानदार खेळी केली आहे. तर डेव्हिड वॉर्नरने 43 आणि अॅलेक्स कॅरीने 48 धावा केल्या. त्याचबरोबर सिराजने टीम इंडियासाठी 4 विकेट घेतल्या आहेत.

याशिवाय कर्णधार रोहित शर्मा 15 आणि शुभमन गिल 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत, याशिवाय विराट आणि पुजाराही स्वस्तात बाद झाले आहेत. त्याचवेळी संघाने अवघ्या 151 धावांत 5 विकेट गमावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही, जय पवार यांची माहिती

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT