Shubman Gill WTC : Video पाहून तुम्हीही म्हणाल, कधी कधी सोडून देणं खूप महागात पडतं...

Shubman Gill Video WTC
Shubman Gill Video WTC esakal

Shubman Gill Video WTC : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियााच पहिला डाव 500 धावांच्या आत रोखला. भारताने कांगारूंना 469 धावांवर ऑल आऊट केले. मात्र यानंतर भारताचा दुसरा डाव सुरू झाला त्यावेळी सुरूवातीला सहाच्या रनरेटने धावा केल्या. मात्र कांगारूंनी भारताला एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरूवात केली.

Shubman Gill Video WTC
Rohit Sharma WTC Final : घेतो घेतो म्हणत हात झटकले.... रोहितनं पंचांनाच गंडवलं; Video व्हायरल

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी संघाला 6 षटकात 30 धावांपर्यंत पोहचवले. मात्र पॅट कमिन्सने 15 धावांवर खेळणाऱ्या रोहित शर्माला पायचित बाद केले. तर पुढच्याच षटकात स्कॉट बोलँडने शुभमन गिलचा 12 धावांवर त्रिफळा उडवला. शुभमन गिलची ही विकेट भारतासाठी सर्वात धक्कादायक होती.

शुभमन गिलने बोलँडचा हा चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू टप्पा घेतल्यानंतर गिलच्या दिशेने वेगात घुसला. गिलला काही समजायच्या आतच या चेंडूने गिलची दांडी गुल केली होती. आपला त्रिफळा उडाला आहे यावर गिलला काही क्षण विश्वासच बसला नाही. मात्र त्याला पॅव्हेलियनमध्ये परतण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

Shubman Gill Video WTC
Ind vs Aus WTC Final Day 2 LIVE : कांगारूंने दिले धक्के, दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये

गिल बाद झाल्यानंतर भारताची अवस्था 2 बाद 30 धावा अशी झाली होती. आता भारतीय संघाचा डाव सावरण्याची मदार अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीवर होती. या दोघांनी संघाच्या धावसंख्येत 20 धावा जोडल्या. चेतेश्वर पुजाराचे यात 14 धावांचे योगदान होते. म्हणजे तो विराटपेक्षा चांगल्या गतीने धावा करत होता. मात्र पुजाराने गिलसारखीच चूक केली.

त्याने कॅमेरून ग्रीन टाकत असलेल्या 14 व्या षटकातील 5 वा चेंडू सोडून देण्याचा निर्णय घेतला. मात्र हा चेंडू देखील पडल्यानंतर आत आला आणि पुजाराची स्टम्पच घेऊन गेला. चांगल्या लयीत असलेल्या पुजाराला आपण हा चेंडू सोडून देण्याची मोठी चूक केल्याची जाणीव झाली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com