Ind vs Aus Test Ravindra Jadeja SAKAL
क्रीडा

Ind vs Aus: जडेजा पास! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या करणार फिरकीचा तांडव

सकाळ ऑनलाईन टीम

Ind vs Aus Test Ravindra Jadeja : अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमधून पूर्णपणे तंदुरुस्त होत असून आता ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे खेळविण्यात येणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी त्याची भारतीय संघात निवड होणार आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. दुसऱ्या कसोटीत त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

जडेजा गेल्या वर्षी जुलै महिन्यात अखेरचा कसोटी सामना खेळला. भारत-इंग्लंड यांच्यामध्ये हा कसोटी सामना रंगला. त्यानंतर आशिया करंडकादरम्यान जडेजाला दुखापत झाली. ट्वेंटी-२० विश्‍वकरंडकामधूनही त्याला माघार घ्यावी लागली. तिथपासून आतापर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये त्याचे पुनरागमन होणार आहे.

व्हिसाच्या विलंबामुळे ख्वाजा थांबला

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाने बुधवारी भारताकडे प्रयाण केले. मात्र ऑस्ट्रेलियाचा खेळाडू उस्मान ख्वाजा संघासोबत भारतामध्ये येऊ शकला नाही. व्हिसाच्या विलंबामुळे तो एक दिवस उशिरा भारतात येणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, के. एस. भारत (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), रवीचंद्रन अश्‍विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT