IND vs NZ: 'मालिकावीराचा पुरस्कार माझा नाही', विक्रमी विजयानंतर कॅप्टन पांड्या हे काय म्हणाला

माझं पतन माझ्या शर्तींवर होणार! मालिका विजयानंतर हार्दिक गरजला पण...
Hardik Pandya
Hardik Pandya

India vs New Zealand 3rd T20I : शुभमन गिलच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय शतकाच्या बळावर भारताने मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला. हा टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय आणि न्यूझीलंडचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वात मोठा पराभव आहे. याआधी भारताने आयर्लंडविरुद्ध 143 धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे.

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 234 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पॉवरप्लेमध्येच 5 विकेट्स गमावल्या होत्या. संघाचा डाव 66 धावांवर आटोपला. त्याच वेळी, कर्णधार हार्दिक पांड्याने आपला प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार संपूर्ण सपोर्ट स्टाफला समर्पित केला.

Hardik Pandya
IND vs NZ: फ्लाईंग सूर्या! ठरला स्लीपमधाला बाप माणूस

हार्दिकने तीन सामन्यांमध्ये 48.50 च्या सरासरीने आणि 124.35 च्या स्ट्राईक रेटने 97 धावा केल्या. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याच वेळी मालिकेतील सर्वाधिक विकेट करण्याच्या बाबतीत हार्दिक पहिल्या स्थानावर आहे. त्याने एकूण 5 विकेट घेतल्या.

Hardik Pandya
Hardik Pandya : माझं पतन माझ्या शर्तींवर होणार! मालिका विजयानंतर हार्दिक गरजला

सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, मला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे पण तो फक्त माझा नाही. खरे सांगायचे तर हा पुरस्कार संपूर्ण सपोर्ट स्टाफला जातो. अनेक खेळाडूंची कामगिरी अप्रतिम होती. मी त्या सर्वांसाठी आनंदी आहे.

पुढे बोलताणा कर्णधार म्हणाला, “माझ्या आयुष्याचा आणि कर्णधारपदाचा एक अतिशय साधा नियम आहे, जरी मी हरलो तरी माझ्या अटींवर हरेन. मी माझ्या निर्णयांची जबाबदारी घेण्यास घाबरत नाही. आव्हानांचा सामना कसा करायचा यावर आम्ही आपापसात चर्चा केली. आज आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान स्वीकारले आणि अशीच कामगिरी कायम ठेवण्याची आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com