ind vs eng 1st test Shreyas Iyer Marathi News sakal
क्रीडा

Ind vs Eng कसोटीपूर्वी नेटमध्ये दिग्गज खेळाडू जखमी, टीम इंडियाच्या वैद्यकिय टीमची दमछाक

India vs England Test Series News :

Kiran Mahanavar

India vs England Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील हैदराबादमध्ये गुरुवार 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या सराव सत्रादरम्यान मंगळवारी नेटमध्ये फलंदाजी करताना श्रेयस अय्यरच्या उजव्या हाताला दुखापत झाली.

आज सकाळी सराव सत्रात श्रेयस अय्यरच्या डाव्या मनगटावर चेंडू लागला. थ्रो डाऊनने टाकलेला चेंडू त्यांच्या मनगटावर जोरात लागला. आणि तो वेदनेने ओरडताना दिसला. त्यावेळी टीम इंडियाच्या वैद्यकिय टीमची दमछाक झाली, एक चेंडू खेळल्यानंतर मैदानातून बाहेर आला. मग वैद्यकिय टीमने श्रेयस अय्यरच्या डाव्या मनगटावर आईस पॅक ठेवला.

अय्यरच्या दुखापतीमुळे टीम इंडियासाठी डोकेदुखी असू शकते, कारण तो संघाच्या मधल्या फळीचा महत्त्वाचा भाग आहे. विराट कोहलीही पहिल्या दोन कसोटींसाठी उपलब्ध नाही. एक दिवस आधी त्याने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले होते.

अशा परिस्थितीत मधल्या फळीची जबाबदारी फक्त अय्यर आणि केएल राहुलवर आहे. कोहलीच्या जागी रिंकू सिंग, रजत पाटीदार आणि सरफराज खान यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघ हैदराबादमध्ये सराव करत आहेत. इंग्लंडचा संघ रविवारी रात्री एक दिवस आधी हैदराबादला पोहोचला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका महत्त्वाची आहे. सध्या चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड सातव्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT