ICC च्या ODI संघात टीम इंडियाचा डंका! 11 पैकी 6 खेळाडू भारताचे... जाणून घ्या कुणाला मिळाली संधी

Rohit Sharma to lead 6 Indian players included in ICC Men's ODI Team of the Year 2023 cricket news in marathi
Rohit Sharma to lead 6 Indian players included in ICC Men's ODI Team of the Year 2023 cricket news in marathi sakal
Updated on

ICC Men's ODI Team of the Year 2023 : 2023 साली भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली होती. भारतीय संघाने सलग सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती, मात्र ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम फेरीत भारतीय संघाचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला.

दरम्यान, आता आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम वनडे संघ जाहीर केला आहे. तिथे टीम इंडियाचा डंका पाहिला मिळत आहे.

Rohit Sharma to lead 6 Indian players included in ICC Men's ODI Team of the Year 2023 cricket news in marathi
रोहित शर्मा अन् विराट कोहली प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला आले तरी का नाहीत? मोठे कारण समोर आले

आयसीसीने जाहीर केलेल्या 11 खेळाडूंच्या संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकणारा पॅट कमिन्सला कर्णधारपद तर सोडाच, त्याला संघातही स्थान मिळालेले नाही. रोहित शर्माकडे संघाची कमान आली असून त्याची आयसीसीने ओपनिंगसाठी निवड केली आहे.

त्याने गेल्या वर्षी एकदिवसीय सामन्यात 1255 धावा केल्या होत्या. रोहित शर्माचा जोडीदार म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली नाव्हती, पण गतवर्ष त्याच्यासाठी संस्मरणीय ठरले. त्याने आपल्या बॅटने 200 धावांची उत्कृष्ट खेळी केली.

तिसऱ्या क्रमांकासाठी ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडची निवड केली आहे. ज्याने उपांत्य फेरीत आणि नंतर फायनलमध्ये भारतीय संघाविरुद्ध शानदार खेळला होता. त्याने भारतीय संघाविरुद्ध 137 धावांची खेळी खेळली आणि सामना जवळपास एकतर्फी केला.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची चौथ्या क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. कोहलीने 2023 मध्ये 6 शतके झळकावली होती. यासोबतच त्याने सचिन तेंडुलकरचा वनडेमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रमही मोडला.

न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलसह दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनलाही आयसीसीने स्थान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॅनसेनही संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. तर ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झाम्पाचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

त्यात वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीला स्थान देण्यात आले आहे. कुलदीप यादवही संघात आहे. सिराजने श्रीलंकेविरुद्ध आपल्या घातक गोलंदाजीने कहर केला, तर मोहम्मद शमीने कमी सामने खेळूनही आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप सर्वाधिक विकेट्स घेतल्या.

आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर 2023 – रोहित शर्मा, शुबमन गिल, ट्रेविस हेड, विराट कोहली, डॅरिल मिचेल, हेनरिक क्लासेन, मार्को जेन्सन, ऍडम झॅम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com