Rohit-Sharma-Out 
क्रीडा

Video: रोहित शर्माचं करायचं तरी काय... आता परत केली तीच चूक!

विराज भागवत

तुम्ही पाहिलात का रोहितचा हा व्हिडीओ

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा हा त्याच्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. इंग्लंडविरूद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत आतापर्यंत रोहितने चार डाव खेळले. पहिल्या डावात तो तिशीत बाद झाला. दुसऱ्या डावात पावसामुळे त्याला आपली फलंदाजी दाखवताच आली नाही. त्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहितने अतिशय सुदंर अशी फलंदाजी केली.११ चौकार आणि १ षटकार अशी खेळी सजवत त्याने ८३ धावा केल्या. पण दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात मात्र रोहित विशीतच बाद झाला. पहिल्या कसोटीत केलेली चूक पुन्हा केल्याने रोहितला दुसऱ्या डावात फार मोठी खेळी करता आली नाही.

पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित-राहुल जोडीने दमदार ९७ धावांची भागीदारी केली. त्यावेळी रोहितने ३० धावांचा टप्पा पार केल्यानंतर एक उसळता चेंडू आला. रोहितला तो फटका मारण्याचा मोह आवरला नाही आणि त्या चेंडूवर रोहित सीमारेषेवर झेलबाद झाला. या चुकीतून रोहितने धडा घेतला असेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण नेमका दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात जेव्हा भारताला रोहितकडून संयमी खेळीची गरज होती, त्याच वेळी रोहित पुन्हा एकदा इंग्लंडच्या जाळ्यात अडकला. रोहित २१ धावांवर खेळत असताना मार्क वूडने त्याला बाऊन्सर चेंडू टाकला. रोहितने तो चेंडू हवेत खेळला पण चेंडूचा वेग आणि उंची यांचा नीट अंदाज न आल्याने रोहित सीमारेषेवर झेलबाद झाला.

पाहा, रोहित कसा झाला बाद-

रोहितच्या त्या बेजबाबदार फटक्यानंतर त्याला टीकेचा सामनादेखील करावाच लागला. कारण दुसऱ्या डावात भारतीय संघाला एक भक्कम सलामी देणं ही राहुल-रोहित जोडीची जबाबदारी होती. पण राहुल अतिशय अप्रतिम अशा स्विंग चेंडूवर झेलबाद झाला. त्याने केवळ ५ धावा केल्या. त्यानंतर रोहितने संयमाने खेळणं चाहत्यांना अपेक्षित होतं, पण रोहितने बेजबाबदारपणे फटका खेळला आणि त्यामुळे भारत संकटात सापडला, अशी मतं काहींनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT