'शट-अप' सेलिब्रेशन स्टाईलवर अखेर सिराजनेच दिलं स्पष्ट उत्तर

'शट-अप' सेलिब्रेशन स्टाईलवर अखेर सिराजनेच दिलं स्पष्ट उत्तर Ind vs Eng: विकेट घेतल्यावर सिराज जे सेलिब्रेशन करतो त्यावरून त्याच्यावर होतेय टीका Eng vs Ind 2nd Test Mohammed Siraj opens up about his finger on lips shut up celebration style vjb 91
Mohd-Siraj-Celebration
Mohd-Siraj-Celebration
Updated on

Ind vs Eng 2nd Test: भारतीय संघाने पहिल्या डावात ३६४ धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्माच्या ८३ आणि लोकेश राहुलच्या १२९ धावांच्या दमदार खेळीमुळे भारताला ३५०चा आकडा पार करता आला. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या जो रूटने १८० धावांची झुंजार खेळी केली. रूटच्या दीडशतकी फटक्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात २७ धावांची आघाडी मिळाली. बुमराहची गोलंदाजी फारशी परिणामकारक ठरली नाही, पण नवख्या सिराजने चार गडी बाद केले. स्विंग बॉलिंगचे उत्तम उदाहरण पेश करत त्याने आपली छाप उमटवली. मात्र चांगली कामगिरी करूनही त्याच्यावर एका मुद्द्यावर टीका केली जात आहे. या टीकेला त्याने उत्तर दिले.

Mohd-Siraj-Celebration
IND vs ENG: पुजाराच्या जागी भारताने 'या' खेळाडूला संधी द्यावी!

विकेट मिळवल्यानंतर प्रत्येक गोलंदाज आपल्या पद्धतीने ती विकेट साजरी करतो. नवखा गोलंदाज सिराज विकेट मिळाल्यानंतर फलंदाजाच्या दिशेने पाहत तोंडावर बोट ठेवून शट-अप म्हटल्यासारखं सेलिब्रेशन करतो. यावरून त्याच्यावर अनेकांनी टीका केली. जेव्हा तुम्ही विकेट मिळवता त्यावेळी तुम्ही युद्ध जिंकलेलं असतं. मग अशा वेळी तुम्ही पुन्हा फलंदाजाला डिवचण्याची गरज काय? असा काहींनी सवाल केला होता. या साऱ्या टीकांना आणि सवालांना त्यांनी उत्तर दिलं.

Mohd-Siraj-Celebration
IND vs ENG कसोटी मालिकेत गावसकरांना खटकतेय एक गोष्ट; जाणून घ्या

चार गडी बाद केल्यानंतर सिराजला विचारण्यात आलं की तू शट-अप सेलिब्रेशन का करतोस? त्यावर तो म्हणाला, "मी जे सेलिब्रेशन करतो त्याचा फलंदाजांशी संबंध नसतो. माझ्यावर काही लोक पूर्वी टीका करत होते. मी चांगली गोलंदाजी करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं अशा लोकांना मी ते उत्तर देत असतो. अनेक टीकाकार म्हणतात की नवखा सिराज काय करून दाखवणार... त्या साऱ्या टीकाकारांना माझ्या गोलंदाजीने उत्तर देण्याच्या दृष्टीने मी विकेट घेतल्यावर तसं सेलिब्रेशन करतो असं सिराजने स्पष्ट केलं."

Mohd-Siraj-Celebration
IND vs ENG : ज्यो रुटनं केली पंतची कॉपी, पाहा व्हिडिओ

"इंग्लंडच्या पिचवर वेगवान गोलंदाजांना कायमच चांगली मदत मिळते. अशा पिचवर वेगवान गोलंदाज महत्त्वाची कामगिरी बजावतात. आम्ही ठरवून ठराविक भागातच गोलंदाजी करत होतो. एकाच ठिकाणी टप्पा ठेवण्याचा आमचा प्रयत्न होता. रणजी करंडक खेळताना जसा प्लॅन करून मी गोलंदाजी करायचो तशीच शिस्तबद्ध गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मी यावेळीही करतोय. फार काही विचार न करता सरळ, साधी आणि एका टप्प्यावर गोलंदाजी करणे हाच माझा अतिशय साधा प्लॅन होता", असंही तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com