India U19  Sakal
क्रीडा

लंकेसमोर युवा टीम इंडियाचा डंका; विक्रमासह Asia Cup वर कोरलं नाव

सुशांत जाधव

India vs Sri Lanka U19 Asia Cup Final : धूलच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाने श्रीलंकेला नमवत विक्रमी आठव्यांदा आशियाई चषक स्पर्धा जिंकली आहे. यात 2012 मध्ये संयुक्तरित्या मिळवलेल्या विजेतेपदाचाही समावेश आहे. श्रीलंका संघाला 9 विकेट्सनी पराभूत करत आशियाई चॅम्पियनशिप जिंकण्याची हॅटट्रिकही युवा टीम इंडियाने पूर्ण केलीये.

19 वर्षाखालील आशिया कपची (Asia Cup) फायनल दुबईच्या मैदानात पार पडली. भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात झालेल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आणला. सरशेवटी डकवर्थ लुईच्या नियमानुसार भारतीय संघाला 9 विकेट्सनी विजयी घोषीत करण्यात आले. श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 38 षटकात 9 बाद 106 धावा केल्या होत्या. भारतीय युवा संघाने 21.3 षटकात 1 विकेटच्या मोबदल्यात 104 धावा केल्या.

डीएलएस (DLS) भारतीय संघाला 102 धावांचे लक्ष्य मिळाले होते. ही धावसंख्या टीम इंडियाने एका विकेटच्या मोबदल्यात पार केली. आतापर्यंत नऊ वेळा अंडर 19 आशिया कप स्पर्धा झाली आहे. यात तब्बल आठवेळा भारतीय संघाने बाजी मारलीये. ज्या ज्या वेळी भारतीय संघ फायनलमध्ये पोहचलाय त्यावेळी टीम इंडियाच चॅम्पियन ठरली आहे. पावसामुळे खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल होती. तरीही श्रीलंकन कर्णधाराने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली होती.

राजवर्धन हैंगरगेकर आणि रवि कुमारने नव्या चेंडूवर सुरेख गोलंदाजी केली. डावखुऱ्या रवीनं चौथ्या षटकात चामिंडू विक्रमसिंघे च्या रुपात संघाला पहिले यश मिळवून दिले. शेवोन डॅनियल 11 व्या षटकात आराध्या यादवच्या हाती झेल देऊन परतला. त्याने 15 धावांची भर घातली. एका वेळी श्रीलंकेची अवस्था 7 बाद 57 अशी झाली होती. संघ शंभरी पार करेल की नाही अशी शंका असताना 33 व्या षटकात पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी श्रीलंकेच्या धावफलकावर 7 बाद 74 धावा होत्या. पावासामुळे सामना 38-38 षटकांचा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Civic Scam: पुणे महापालिकेतील बोगस भरती घोटाळा उघड: ३० लाखांच्या डीलचा व्हिडिओ समोर, शेकडो तरुणांची फसवणूक

Indapur Crime : तरंगवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून लोखंडी रॉडने वार करून 54 वर्षीय व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Karad Silver-Cash Seizure: कऱ्हाडमध्ये ट्रॅव्हल्स वाहनातून १५० किलो चांदी व ४० लाखांची रोकड जप्त; पोलिस व आयकर विभागाची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT