ICC सर्वोत्तम पुरस्काराच्या शर्यतीत स्मृतीसह 'चारचौघी'

Smriti Mandhana
Smriti Mandhana Sakal

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्काराच्या यादीत स्मृती मानधनाला (Smriti Mandhana) स्थान मिळाले आहे. ती पुन्हा एकदा आयसीसीच्या सर्वोच्च पुरस्काराच्या शर्यतीत दिसतेय. याआधी 2018 मध्ये स्मृती मानधनाने रॅचेल हेहो-फ्लिंट (Rachael Heyhoe Flint Trophy for ICC Women’s Cricketer) पुरस्काराने गौरवण्यात आले होते. यंदाच्या वर्षी पुन्हा तिला हा पुरस्कार पटकावण्याची संधी आहे. तिच्याशिवाय इंग्लंडची क्रिकेटर टॅमी ब्यूमोंट, नेट सायव्हर आणि आयर्लंडची गॅबी लुईस यांच्या नावाला नामांकन प्राप्त झाले आहे.

स्मृती मानधनाने 2021 या वर्षात 9 टी सामन्यात 32 च्या सरासरीने 255 धावा केल्या आहेत. यात 2 अर्धशताचा समावेश आहे. एका बाजूला महिला गटातून स्मृतीची या पुरस्काराच्या शर्यतीत वर्णी लागली असताना भारतीय पुरुष संघातील एकाही खेळाडूला आयसीसी पुरस्काराचे नामांकन मिळालेले नाही. जानेवारीमध्ये विजेत्या खेळाडूच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. पुरुष गटातील Sir Garfield Sobers Trophy for the ICC Player of the Year सर्वात्तम खेळाडूंच्या यादीत जी चार नावे आहेत त्यात पाकिस्तानच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे. शाहीन आफ्रिदी, जो रुट आणि मोहम्मद रिझवान यांच्यासह न्यूझीलंडचा केन विल्यमसन या चार नावात वर्षातील सर्वोत्तम कोण? याची शर्यत असेल.

Smriti Mandhana
सौरभ गांगुलीचे आता घरातच होणार 'विलगीकरण'

स्मृती मानधनासह शर्यतीत असलेल्या महिला खेळाडूंची कामगिरी

स्मृती मानधनाने या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध अर्धशतके झळकावली आहे. आयर्लंडच्या गॅबी लुईसने 10 टी20 सामन्यात 41 च्या सरासरीनं 325 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तिच्या या कामगिरीच्या जोरावरच आयर्लंड महिला संघाने 2 मालिका जिंकल्या होत्या. आयर्लंडकडून शतकी खेळी करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.

Smriti Mandhana
Rahul Dravid चा हा रेकॉर्ड पुन्हा होणं नाही!

ब्यूमोंट आणि सायव्हरचीही धमाल कामगिरी

इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट आणि नेट सायव्हर या दोघींनीही लक्षवेधी कामगिरी केलीये. ब्यूमोंटने 9 सामन्यात 34 च्या सरासरीनं 303 धावा आहेत. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. सायव्हरनं 9 सामन्यात 19 च्या सरासरीनं 153 धावा आणि 20 च्या सरासरीनं 10 विकेटही घेतल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com