WTC Final Ind vs Aus Live Streaming
WTC Final Ind vs Aus Live Streaming 
क्रीडा

WTC Final Ind vs Aus Live Streaming : 'फ्री मध्ये पाहता येणार फायनल! कसा पाहू शकता सामना हे जाणून घ्या

Kiran Mahanavar

WTC Final Ind vs Aus Live Streaming : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून सुरू होत आहे. हा रोमांचक सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. अशा परिस्थितीत हा सामना कसा, कधी आणि कुठे पाहता येईल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला या सामन्याचा फ्री मध्ये आनंद कसा लुटता येईल पाहू.

दोन्ही संघांच्या नजरा पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या विजेतेपदावर आहेत. अशा परिस्थितीत या सामन्यात अनेक विक्रमही होणार आहेत. टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे तर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया संघाची कमान सांभाळत आहेत.

टीम इंडियाने कांगारू संघाविरुद्ध मागील चार कसोटी मालिका जिंकल्या आहेत. या दरम्यान भारताने ऑस्ट्रेलियाचा 2 वेळा त्यांच्याच घरात पराभव केला आहे. रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंत 10 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवायचा आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC फायनल सामना कधी, कुठे, किती वाजता खेळल्या जाणार आहे?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारपासून (७ जून) इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. नाणेफेक 2.30 वाजता होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC फायनल सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे पहावे?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. हा सामना दूरदर्शनवर विनामूल्य पाहता येईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे पाहायचे?

तुम्ही Disney + Hotstar अॅपवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ICC WTC फायनल ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: POK भारताचे आहे अन् आम्ही ते परत घेऊ; अमित शाह यांचा इशारा

Mahadev App: महादेव बेटिंग अ‍ॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Lok Sabha Election: INDIA आघाडीला किती जागा मिळणार? काँग्रेस नेत्याने पहिल्यांदाच केला एवढा मोठा दावा

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

SCROLL FOR NEXT