Ind vs Aus WTC Final: खेळपट्टीमुळे रद्द होऊ शकतो WTC Final सामना? जाणून घ्या काय आहे प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ind vs Aus WTC Final

Ind vs Aus WTC Final: खेळपट्टीमुळे रद्द होऊ शकतो WTC Final सामना? जाणून घ्या काय आहे प्रकरण

Ind vs Aus WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी ओव्हलची खेळपट्टी गवतामुळे चर्चेत आहे. दरम्यान बुधवारपासून (7 जून) सुरू होणाऱ्या सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक नव्हे तर दोन खेळपट्ट्या तयार केल्याचं वृत्त आहे. आयसीसीने खबरदारी म्हणून हे पाऊल उचलले आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, लंडनमध्ये सुरू असलेले ऑइल प्रोटेस्ट आणि त्यामुळे निर्माण होणारे व्यत्यय लक्षात घेऊन आयसीसीने दोन खेळपट्ट्या तयार करण्याचा निर्णय घेतला. आंदोलक दक्षिण लंडनमधील मैदानात घुसखोरी करू शकतात. आयसीसीला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहायचे आहे. त्यामुळेच त्याने खेळण्याची स्थितीही बदलली आहे.

एक नवीन कलम (6.4) देखील समाविष्ट केला आहे, जो कसोटीपूर्वी किंवा दरम्यान खेळपट्टी खराब झाल्यास लागू होईल. भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघांना या संभाव्य धोक्याची माहिती देण्यात आली आहे. सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत. या घडामोडींची माहिती असलेल्या एका सूत्राने जोर दिला की, हा सामना चॅम्पियनशिपचा अंतिम सामना असल्याने अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे.

या परिस्थितीत खेळपट्टी बदलणार!

WTC फायनलसाठी ICC च्या नवीन प्लेइंग कंडिशननुसार, कोणत्या परिस्थितीत खेळपट्टी बदलली जाऊ शकते, तेही आता जाणून घेऊया.

6.4.1 : ज्या मैदानावर सामना खेळला जात आहे ती खेळपट्टी सुरक्षित नाही असे मैदानावरील पंचाला वाटत असल्यास, सामना रेफरीला कळवून सामना थांबवू शकतो.

6.4.2: या प्रकरणात मैदानावरील पंच आणि ICC सामनाधिकारी दोन्ही कर्णधारांशी बोलतील.

6.4.3: जर कर्णधारांना वाटत असेल की ते खेळू शकतात तर सामना सुरू राहील.

6.4.4: खेळ चालू ठेवता येत नाही असे समजल्यास, मैदानावरील पंच आणि ICC सामनाधिकारी खेळपट्टीची दुरुस्ती करून खेळ पुन्हा सुरू करता येईल का हे ठरवतील. दुरूस्तीनंतर खेळपट्टी कोणत्याही एका संघासाठी फायदेशीर नाही, हेही पंचांना पाहावे लागेल.

6.4.5: विद्यमान खेळपट्टी दुरुस्त करता येणार नाही असे ठरल्यास, सामना पंच त्याच ठिकाणी दुसर्‍या खेळपट्टीवर सामना करवून घेण्याबाबत आयसीसीशी बोलू शकतात. दुसरी खेळपट्टी अशी असावी की कसोटी सामना होऊ शकेल.

६.४.६: कोणत्याही नियोजित दिवशी दुसऱ्या खेळपट्टीवरही सामना खेळवला जाऊ शकत नाही असे आढळल्यास, कसोटी सामना रद्द करण्यात येईल.

6.4.7: ICC सामनाधिकारी दोन्ही संघांचे कर्णधार आणि मैदानाचे प्रमुख यांना संपूर्ण निर्णय प्रक्रियेदरम्यान अद्ययावत ठेवतील.