क्रीडा

गुजरात टायटन्सच्या ताफ्यात अफगाणिस्तानचा 'हिरा'

जेसन रॉयच्या बदल्यात रैना नाही तर खेळणार अफगाणिस्तानचा खेळाडू

सकाळ वृत्तसेवा

IPL 2022: आयपीएलच्या हंगामापूर्वी गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का बसला होता. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी एक नवा गडी आपल्या ताफ्यात सामील केलाय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2022 मध्ये पहिल्यांदाच गुजरात टायटन्स संघ मैदानात उतरणार आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयने आयपीएल मधून माघार घेतली होती. रॉयच्या माघारीनंतर गुजरात संघ कोणाला संघात स्थान देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या यादीत भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैनाचा समावेश होता. रैनाला आयपीएल मध्ये कोणत्याही संघाने घेतले नव्हते.

सुरेश रैनाला या संघात संधी मिळणार का? याची ही चर्चा सुरू होती. पण सुरेश रैनाला न घेता त्यांनी अफगाणिस्तानच्या गड्याला संधी दिली आहे. अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक- फलंदाज रहामानुल्ला गुरबाजला आता गुजरात टायटन्स संघात रॉयची जागा घेईल. रहामानुल्ला गुरबाज आत्तापर्यत आंतरराष्ट्रीय 20 टी-20 सामने खेळाला आहे. टी-20 मध्ये 2 अर्धशतके केली आहेत. त्याने आत्ता पर्यत 531 धावा केल्या आहेत. गुरबाजने 9 वनडे खेळल्या आहेत. या मध्ये त्याने तीन शतक केली आहेत. एकुण 428 धावा केल्या आहेत.

गुजरात टायटन्समध्ये 50 लाखांच्या मुळ किमतीवर तो संघात सामील होईल. राशिद खान, नूर अहमद यांच्या सोबत आयपीएलमध्ये खेळणारा गुरबाज हा अफगाणिस्तानचा तिसरा खेळाडू आहे.गुजरात टासटन्स संघाचा पहिला आयपीएलचा सामना 28 मार्चला वानखेडे मैदानावर मुंबई येथे होणार आहे. गुजरातचा नवा संघ लखनऊ सुपर जायंट्स या नव्या संघाविरुद्धच्या लढतीने स्पर्धेला सलामी देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT