MS Dhoni 
IPL

MS Dhoni : "धोनी एक जादूगर, तो कचऱ्याचे रूपांतर..." ; ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य!

Sandip Kapde

MS Dhoni : इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सामना कोणाशी होईल हे आज ठरणार आहे. क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. दरम्यान यावर्षी एम एस धोनी आपीएलच्या ट्राफीवर नाव कोरणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

दरम्यान महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२३ च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ४१ वर्षीय धोनीची फॅन फॉलोइंग देशात आणि परदेशात लाखोंच्या घरात आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन म्हणतो की धोनी हा जादूगार आहे आणि तो कचऱ्याचे देखील सोन्यात रूपांतर कसे करायचे हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.

मॅथ्यू हेडन हा अनुभवी क्रिकेटपटू आहे तसेच तो धोनीच्या कर्णधारपदाचा देखील मोठा चाहता आहे. मॅथ्यू हेडन याने धोनीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, सिएलकेच्या यशात धोनीचा मोठा वाटा आहे. त्याच्या नेतृ्त्वाखाली सिएसकेने १०व्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. स्पर्धेच्या सुरूवातीला सीएसकेची गोलंदाडी संथ होती. मात्र धोनीने त्यातून सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे धोनीचे कौतुक होत आहेत.

धोनी या स्पर्धेत गुडघ्याच्या दुखापतीने खेळत आहे. एक खेळाडू म्हणून त्याचे भविष्य ठरवण्यासाठी त्याने स्वत:ला ८-९ महिने दिले आहेत. मात्र, पुढील आयपीएलमध्ये तो खेळणार नसल्याचे हेडनचे मत आहे

हेडनने पीटीआयला सांगितले की, "एमएस एक जादूगार आहे. कचऱ्याचे सोन्यामध्ये रूपांतर करतो. तो अतिशय कुशल आणि सकारात्मक कर्णधार आहे. त्याने अतिशय मनोरंजक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यावरून त्याची नम्रता दिसून येते. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन आणि त्यांचा संघ यांच्यातील समन्वय मजबूत आहे आणि संघ मजबूत करण्याच्या प्रक्रियेतील धोनी एक दुवा देखील आहे. प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी एक प्रक्रिया असते आणि ती त्याने आधी भारतीय संघासोबत आणि आता सीएसकेत देखील दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT