Mike Hussey | Rohit Sharma Sakal
IPL

Fact Check: CSK फक्त रोहित शर्मा या एकाच कर्णधाराला घाबरते; खरंच हसी असं म्हणाला? नक्की सत्य काय, जाणून घ्या

Fact Check: चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक माईक हसीने त्यांचा संघ रोहित शर्मा या एकाच कर्णधाराला घाबरत असल्याचे खरंच म्हटलं की ही बातमी खोटी आहे? जाणून घ्या

Pranali Kodre

Mike Hussey Statement Fact Check: इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात शुक्रवारी (5 एप्रिल) 18 वा सामना पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 6 विकेट्सने विजय मिळवला. हा हैदराबादचा दुसरा विजय होता.

दरम्यान, या सामन्यानंतर एका गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. या सामन्यानंतर अशी एक बातमी आली, ज्यात दावा करण्यात आला की चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी याने चेन्नई सुपर किंग्सचे संघव्यवस्थापन रोहित शर्माला घाबरत असल्याचे सांगितले.

बातीमीतील दाव्यानुसार हसीने सांगितले की चेन्नईला एकाच कर्णधाराची भीती वाटते, ज्याने आम्हाला अंतिम सामन्यात पराभूत केलंय आणि आता तो कर्णधार नाही. यातून अप्रत्यक्षरित्या हसीने रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यावर भाष्य केले असल्याचा दावाही करण्यात आला. मात्र, ही बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे.

नक्की खरं काय?

खरंतर हैदराबादविरुद्धचा सामना सुरू असताना माईक हसी समालोचकांशी संवाद साधत होता. यावेळी त्याने विविध विषयांवर भाष्य केले. त्याने एमएस धोनी संघात असल्याने भारतभरात चेन्नई संघाला पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले.

त्याचबरोबर या सामन्यातील खेळपट्टीबाबत आणि संघाच्या योजनांबद्दल सांगितले. तसेच धोनी अद्यापही त्याची तंदुरुस्ती मिळवत असल्याचेही सांगितले. तर मोईन अलीला संधी देण्याबाबतही त्याने भाष्य केले.

मात्र त्याने कधीही मुंबई इंडियन्स किंवा रोहित शर्मा किंवा मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वबदलाबाबत या संपूर्ण संवादात भाष्य केले नाही. त्याच्या मुलाखतीचा अधिकृत व्हिडिओ आयपीएलच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

मुंबई आणि चेन्नई संघात नेतृत्वबदल

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघात नेतृत्वबदल करण्यात आले आहेत. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. त्याचबरोबर एमएस धोनीने चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवली आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुंबईने रोहितच्या नेतृत्वात, तर चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात प्रत्येकी 5 आयपीएल विजेतीपदे मिळवली आहेत.

त्याचबरोबर 2013, 2015 आणि 2019 साली झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईनेच चेन्नईला पराभूत केले आहे. त्यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित होता, तर चेन्नईचा कर्णधार धोनी होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT