Hardik Pandya GT vs MI IPL 2024 match video goes viral 
IPL

Viral Video : अखेर बॉस कोण पांड्यानं दिलं दाखवून.... रोहित शर्माला थेट बाउंड्रीवर पाठवलं

Hardik Pandya GT vs MI IPL 2024 match video goes viral : कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ गुजरात टायटन्सच्या विरोधात सामना खेळला.

रोहित कणसे

Hardik Pandya GT vs MI IPL 2024 match video goes viral : कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ गुजरात टायटन्सच्या विरोधात सामना खेळला. हार्दिकच्या मुंबईतील वापसीनंतर हा पहिलाच सामना होता. या मॅचदरम्यान सर्वांचे लक्ष हे रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या केमेस्ट्रीकडे होते. दरम्यान या सामन्यादरम्यान कर्णधार हार्दिक पांड्याने रोहित शर्माला चांगलंच पळवल्याचं पाहायला मिळालं. तसेच रोहित शर्मा देखील पांड्याला अनेकदा सल्ला देताना पाहायला मिळाला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियान्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने माजी कर्णधार रोहित शर्माची फिल्डिंग पोजीशन बदलली. यावेळी हार्दिक रोहितला ग्राउंडवर मागे जाण्यास सांगत असलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ सामन्यातील २०व्या ओव्हरचा आहे. यामध्ये पांड्या रोहितला ३० यार्ड सर्कलच्या बाहेर बाउंड्रीकडे जाण्यास सांगत आहे. रोहित शर्मा हा नेहमी या सर्कलमध्येच फिल्डिंग करतो, मात्र पांड्याने त्याला लाँग ऑफला उभं केलं. यावेळी रोहित शर्माचा चेहरा आणि हावभाव पाहाता त्याला देखील याचं आश्चर्य वाटल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान रोहित शर्मा बाउंड्रीकडे पळत जात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रोहित शर्माचे चाहते हा व्हिडीओ शेअर करत हार्दिक पांड्यावर टीका करताना देखील पाहायला मिळत आहे.

२०२४ च्या आयपीएल सिझनपूर्वी हार्दिक पांड्याला १५ कोटी देऊन गुजरात टायटन्सने ट्रेड केलं आहे. गुजरातकडून खेळताना २०२२ आणि २०२३ मध्ये पांड्याने संघाला आयपीएल फायनलमध्ये घेऊन केला होता. २०२३ च्या सीझनमध्ये त्याने गुजरातला स्पर्धेचे विजेतेपद देखील मिळवून दिलं होतं.

दरम्यान सामन्यात गुजरातने मुंबई समोर १६९ धावांचे आव्हान ठेवले होते. मैदानात उतरलेल्या मुंबईनं खराब सुरूवातीनंतर डाव सावराल होता. रोहित शर्मानं ४३ अन् डेवाल्ड ब्रेविसनं ४६ धावा करत मुंबईची सामन्यावर पकड निर्माण करून दिली. मात्र हे दोन विकेट पडल्यानंतर मुंबईचा संघ म्हणावी तशी कामगिरी करू शकला नाही. या सामन्यात मुंबईच्या संघाला ६ धावांनी पराभावाचा सामना करावा लागला. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने त्यांचा पहिला सामना जिंकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT