
Shubman Gill News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील पाचवा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात गुजरातने 6 धावांनी विजय मिळवला. या विजयासह शुभमन गिलच्या नेतृत्वाची विजयी सुरुवात केली.
आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतल्याने गुजरातने नेतृत्वाची जबाबदारी युवा शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवली. गिलनेही हा विश्वास पहिल्या सामन्यात कायम ठेवत त्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखवली.
दरम्यान, गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने पहिला सामना जिंकल्यानंतर त्याच्या आई-बाबांनीही त्याचे भरभरून कौतुक केले. याचा व्हिडिओही गुजरात टायटन्सने शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की ज्यावेळी गुजरात संघ सामना जिंकल्यानंतर हॉटेलमध्ये पोहचला, त्यावेळी शुभमनचे कुटुंबियही तिथे उपस्थित होते. तो हॉटेलमध्ये येताच त्याच्या वडिलांनी त्याला कडकडून मिठी मारली. त्यानंतर तो आई आणि बहिणीलाही भेटला. या व्हिडिओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्सचा पाऊस पडत आहे.
सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 168 धावा केल्या होत्या. गुजरातकडून साई सुदर्शनने 39 चेंडूत सर्वाधिक 45 धावा केल्या, तर शुभमन गिलने 31 धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 9 बाद 162 धावाच करता आल्या. मुंबईकडून डेवाल्ड ब्रेविसने 46 धावा केल्या, तर रोहित शर्माने 43 धावा केल्या. अझमतुल्लाह ओमरझाई, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.