Mumbai-Indians 
IPL

IPL 2021: 'मुंबई इंडियन्स'ची पहिल्या टप्प्यात काय केलं? वाचा..

विराज भागवत

मुंबईचा संघ गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर

IPL 2021 in UAE: गेल्या सलग दोन वर्षात स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या स्पर्धेत लौकिलाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्स संघाची एक खासियत आहे. हा संघ सुरूवातीच्या सामन्यात जरी पराभूत होत असला, तरी मोक्याच्या क्षणी सर्व सामने जिंकून दमदार पुनरागमन करण्यात पटाईत आहे. यंदाच्या स्पर्धेत भारतात झालेल्या पहिल्या टप्प्यात मुंबईच्या संघाने आतापर्यंत ७ सामन्यांपैकी ४ सामने जिंकून ८ गुण पटकावले आहेत. त्यांचा नेट रनरेटदेखील +०.०६२ आहे. इतर सर्व संघापैकी दिल्ली आणि चेन्नई वगळता इतर सर्व संघांचा नेट रनरेट हा उणे (Negative) आहे. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने पहिल्या टप्प्यातील सात सामन्यात सर्वाधिक २५० धावा केल्या आहेत. तर राहुल चहरने सर्वाधिक ११ बळी टिपले आहेत.

पहिल्या टप्प्यातील मुंबई संघाचे सामने आणि निकाल

  • मुंबई वि. बंगळुरू - बंगळुरूचा २ गडी राखून विजय

  • मुंबई वि. कोलकाता - मुंबईचा १० धावांनी विजय

  • मुंबई वि. हैदराबाद - मुंबईचा १३ धावांनी विजय

  • मुंबई वि. दिल्ली - दिल्लीचा ६ गडी राखून विजय

  • मुंबई वि. पंजाब - पंजाबचा ९ गडी राखून विजय

  • मुंबई वि. राजस्थान - मुंबईचा ७ गडी राखून विजय

  • मुंबई वि. चेन्नई - मुंबईचा ४ गडी राखून विजय

पहिल्या टप्प्यानंतरचा गुणतक्ता

१. दिल्ली - ८ सामन्यांत १२ गुण

२. चेन्नई - ७ सामन्यांत १० गुण

३. बंगळुरू - ७ सामन्यात १० गुण

४. मुंबई - ७ सामन्यात ८ गुण

------------------------------------------

५. राजस्थान - ७ सामन्यात ६ गुण

६. पंजाब - ८ सामन्यात ६ गुण

७. कोलकाता - ७ सामन्यात ४ गुण

८. हैदराबाद - ७ सामन्यात २ गुण

दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी मुंबईचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), अँडम मिल्न, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जेम्स निशम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, मार्को जेन्सन, मोहसिन खान, नॅथन कुल्टर नाईल, पियुष चावला, क्विंटन डिकॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युद्धवीर सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT