esakal | IPL 2021: 'मुंबई इंडियन्स'चं नवं थीम साँग झालं लाँच; पाहा VIDEO
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-Indians-Theme-Song

नीता अंबानींचा व्हिडीओमध्ये स्पेशल डायलॉग

IPL 2021: 'मुंबई इंडियन्स'चं नवं थीम साँग लाँच; पाहा VIDEO

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना (Ind vs Eng 5th Test Cancellation) रद्द झाला. त्यानंतर आता भारतीय खेळाडू IPL 2021साठी सज्ज होत आहेत. भारतीय संघाच्या (Team India) ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर इंग्लंडहून IPL साठी युएईला जाण्याच्या प्लॅनमध्ये बदल करण्यात आला. टीम्सने स्वत:चे खेळाडू इंग्लंडहून युएईला आणले. मुंबई इंडियन्सनेही कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना चार्टर विमानाने युएईला आणले. पाठोपाठ, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील युएईमध्ये दाखल झाला. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सने नवं थीम साँग लाँच केलं.

हेही वाचा: IPL पूर्वी MI च्या ओपनरचा धमाका; आफ्रिकेनं उडवला लंकेचा धुव्वा

कर्णधार रोहित शर्मापासून ते हार्दिक पांड्यापर्यंत सर्वच खेळाडू या व्हिडीओमध्ये नाचताना दिसत आहेत. प्रमुख खेळाडूंच्या डोक्यावर मुंबई इंडियन्सच्या रंगसंगतीचा एक झकास फेटा बांधलेला आहे. 'दुनिया हिला देंगे हम' या ब्रीदवाक्यावर हे थीम साँग आहे. यात संघाच्या मालक नीता अंबानी यांच्या तोंडीही एक डायलॉग आहे. 'मुंबईच्या प्रत्येक कुंटुंबाचा अभिमान आहे मुंबई इंडियन्स', असा एक खास संवाद त्यांच्याकडून मराठीत ऐकायला मिळतो.

क्रिकेटचा देवही मुंबईच्या ताफ्यात झालाय दाखल

मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या खेळाडूंची आणि इतर सपोर्ट स्टाफची खूप काळजी घेतो हे साऱ्यांनाच माहिती आहे. प्रत्येक खेळाडूला आणि सपोर्ट स्टाफला आपापल्या नावाची बॅग देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने सचिन तेंडुलकर लिहीलेल्या एका बॅगेचा फोटो काही दिवसांपूर्वी पोस्ट केला होता. त्यानंतर सचिन स्वत: युएईमध्ये दाखल झाल्याचा व्हिडीओ मुंबईने पोस्ट केला. सचिनचा मुलगा अर्जून तेंडुलकर सध्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहे. त्यामुळे सचिन युएईत मुलगा अर्जून असलेल्या संघाला कसे मार्गदर्शन करतो, याकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहे.

loading image
go to top