IPL 2024 CSK vs RCB Match Tickets Booking esakal
IPL

CSK vs RCB Match Tickets Booking : उद्घाटनाच्या सामन्याची तिकीट विक्री झाली सुरू, जाणून घ्या कसं करायचं ऑनलाईन बुकिंग

धोनी आणि कोहलीच्या चाहत्यांनो लक्ष्य व्हा, ऑनलाईन बुकिंगची संधी आता तुमच्या हातात!

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 CSK vs RCB Match Tickets Booking : आयपीएलच्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली आहे. 22 मार्च रोजी होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यातील सामन्याची तिकीट विक्री सुरू झाली आहे. जर तुम्ही महेंद्रसिंह धोनी किंवा विराट कोहलीचे चाहते असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

आयपीएल 2024 कधीपासून होणार सुरू ?

इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा हंगाम हा 22 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे.

आयपीएल सामन्यांचे ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यासाठीच्या काही निवडक वेबसाईट

- https://www.insider.in

- Paytm app

- BookMyShow (https://in.bookmyshow.com/sports/chennai-super-kings-vs-royal-challengers-bangalore/et00097942)

याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यांचे तिकीट ऑनलाईन बुक करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या https://www.chennaisuperkings.com/bookings/tickets या वेब साईटवर देखील तुम्ही भेट देऊ शकता.

ऑनलाईन तिकीट बुक केल्यावर प्रिंट काढणं गरजेचं आहे?

आयपीएल सामन्यांसाठी ऑनलाईन तिकीट बुक केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी जवळ असणं गरजेचं नाही. तिकीट ऑनलाईन बुक केल्यांनतर चाहत्यांना इ-तिकीट मिळणार आहे. दे दाखवून स्टेडियममध्ये प्रवेश मिळवता येईल.

पहिला सामना कोणामध्ये आहे?

यंदाच्या हंगामात सालाबादप्रमाणे गतविजेत्या आणि उपविजेत्या संघात सामना होणार नाही. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात सामना होणार आहे. हा सामना शुक्रवारी 22 मार्चला सायंकाळी 7.30 ला सुरू होईल.

सामना कुठं होणार आहे?

चेन्नई आणि आरसीबीचा सामना हा चेन्नईचे होम ग्राऊंड चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT