IPL 2024 sakal
IPL

ऑरेंज-पर्पल कॅपमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा! जाणून टॉपवर आहे तरी कोण?

आयपीयलच्या सतराव्या हंगामात दररोज अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर ऑरेंज कॅपमध्ये सुद्धा मोठी लढत पाहायला मिळत आहे. सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.

सकाळ डिजिटल टीम

IPL 2024 : आयपीयलच्या सतराव्या हंगामात दररोज अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर ऑरेंज कॅपमध्ये सुद्धा मोठी लढत पाहायला मिळत आहे. सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने पाच सामन्यांत १०५.३३ च्या सरासरीने ३१६ धावा केल्या आहेत.

विराटनंतर या यादीत दूसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू रियान पराग आहे. रियानने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात ४८ चेंडूत ७६ धावा केल्या आहेत. २२ वर्षीय रियानने ५ सामन्यांत ८७.०० च्या सरासरीने २६१ धावा केल्या. विराट आणि रियान या दोघांमध्ये ५५ धावांचा फरक आहे.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिल आहे. गिलने सहा सामन्यांत ५१.०० च्या सरासरीने २५५ धावा केल्यात. त्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर आहे तर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन पाचव्या क्रमांकावर आहे.

संजू सॅमसनने आत्तापर्यंत पाच सामन्यात ८२.०० च्या सरासरीने २४६ धावा केल्या आहेत आणि साई सुदर्शनने ६ सामन्यांत ३७.६७ च्या सरासरीने २२६ धावा केल्या आहेत. एकंदरीत ही संपूर्ण आकडेवारी पाहिली तर, ऑरेज कॅपच्या शर्यतीत पहिले ५ खेळाडू हे भारतीय आहेत.

पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या ५ गोलंदाजांमध्ये ४ खेळाडू भारतीय...

सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत राजस्थान रॉयल्स संघाचा युझवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावर आहे. चहलने ५ सामन्यांत १३.२० च्या सरासरीने १० विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर दूसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा मुस्तफिजुर रहमान आहे. त्याने ४ सामन्यात १४.२२ च्या सरासरीने ९ विकेट घेतल्या आहेत.

पंजाब किंग्सकडून खेळताना अर्शदीपने ५ सामन्यांत ८ विकेट घेतल्या आहेत. जो तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर गुजरात टायटन्स संघाचा मोहित शर्मा आहे, त्याने ६ सामन्यांत ८ विकेट घेतल्या आहेत. दिल्ली क्रॅपिटल्स संघाचा खलील अहमद ५ सामन्यांत ७ विकेट घेवून पाचव्या क्रंमाकावर आहे.

ऑरेज कॅप बरोबरच पर्पल कॅपमध्ये सुद्धा भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे. पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या ५ पैकी ४ खेळाडू हे भारतीय आहेत. त्यामध्ये मुस्तफिजुर रहमान हा एकमेव विदेशी खेळाडू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT