Hardik Pandya Vs Rohit Sharma ESAKAL
IPL

Hardik Pandya Vs Rohit Sharma IPL 2024 : रोहित अन् पांड्यामध्ये संभाषणच नाही... कर्णधारपद मिळाल्यापासून पांड्या, रोहित बोललेच नाहीत?

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Vs Rohit Sharma IPL 2024 : मुंबई इंडियन्समधील कॅप्टन्सी बदलाला आता जवळपास दोन महिने होत आले आहेत. आयपीएल 2024 चा हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र अजूनही मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याने माजी कर्णधार रोहित शर्मासोबत संभाषन केलेलं नाही.

या दोघांमध्ये 63 दिवस झाले बोलणं झालेलं नाही. रोहितच्याच कॅप्टन्सीखाली मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्यानेच याची पुष्टी दिली आहे.

मुंबई इंडियन्सची आज पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला की, 'रोहित शर्मा दौऱ्यावर होता. त्यामुळे आम्हा दोघांची भेट झालेली नाही. त्याच्याशी बोलण्याची संधी देखील मिळालेली नाही. ज्यावेळी रोहित शर्मा संघासोबत जोडला जाईल त्यावेळी मी त्याच्याशी बोलणार आहे.'

हार्दिकला हवा रोहित शर्माचा पाठिंबा

खेळपट्टीबाबत हार्दिक पांड्याला त्याचं मत विचारलं त्यावेळी हार्दिक पांड्याने रोहित शर्माची याबाबतीत मला मदत होईल असं म्हणाला. हार्दिक पांड्या हा टी 20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

हार्दिक म्हणाला की, 'कोणतीही परिस्थिती बदलेली नाही. रोहित शर्मा मला कोणत्याही वेळी मदत करेल. यात कोणताही ऑकवर्डनेस नसेल. मला माहिती आहे की त्याचा हात कायम माझ्या खांद्यावर असणार आहे.'

नेटकऱ्यांनी दिली नकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्या मुंबईत परतल्यानंतर जोरदार स्वागत केलं होते. मात्र त्याला रोहितच्या ऐवजी कर्णधार केल्यानंतर मात्र चाहत्यांनी त्याविरोधात मत व्यक्त केले होते.

रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर चाहते नाराज झाले होते. अनेक चाहत्यांनी तर मुंबईला इनफॉलो करण्यास सुरूवात केली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएल जिंकली होती.

चाहत्यांच्या नाराजीबाबत बोलताना पांड्या म्हणाला, 'कर्णधार बदलल्यानंतर चाहते नाराज झाले होते. त्यांनी रोष व्यक्त केला होता. मी चाहत्यांच्या भावनांचा आदर करतो. मात्र ज्या काही गोष्टी नियंत्रणाबाहेरच्या असतात. मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकतो. मी तेच करणार आहे.'

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT