IPL 2024 Points Table delhi capitals News sakal
IPL

IPL 2024 Points Table : दिल्लीच्या विजयाने प्ले-ऑफची शर्यत झाली रंजक! मुंबईसह 'या' संघांना बाहेर जाण्याचा खतरा

IPL 2024 Points Table Delhi Capitals : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध एकतर्फी सामना जिंकला आणि पॉइंट टेबलमध्येही मोठी झेप घेतली.

Kiran Mahanavar

IPL 2024 Points Table Delhi Capitals : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध एकतर्फी सामना जिंकला आणि पॉइंट टेबलमध्येही मोठी झेप घेतली. तर, गुजरात टायटन्स संघ या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. ना फलंदाज काही अप्रतिम करू शकले ना गोलंदाजांनी आपली छाप सोडली.

दिल्लीच्या विजयामुळे काही संघांना आता प्ले ऑफमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. त्याचे आता 6 गुण झाले आहेत.

दुसरीकडे, गुजरात टायटन्सला या पराभवामुळे नेट रनरेटमध्ये मोठा फटका बसला आहे. गुजरातचे देखील 6 गुण आहेत, परंतु त्यांचा रन रेट -1.303 वर पोहोचला आहे. आयपीएल 2024 मध्ये, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सने देखील आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये 3 विजय नोंदवले आहेत, परंतु नेट रनरेटमुळे दिल्ली गुणतालिकेत गुजरातपेक्षा एक स्थान वर आहे.

राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्सचे सध्या 8 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे देखील सध्या 8 गुण आहेत, परंतु KKR (+1.399) चा नेट रन रेट CSK (+0.726) पेक्षा चांगला आहे. सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे आणि त्यांचे 8 गुण आहेत, परंतु त्यांच्या संघाचा नेट रन रेट सध्या +0.502 आहे.

लखनौ सुपर जायंट्सचे सध्या 6 गुण आहेत आणि संघ +0.038 च्या धावगतीने पाचव्या स्थानावर आहे. आजचा सामना जिंकल्यानंतर दिल्लीची सहाव्या क्रमांकावर झेप घेतली असून, गुजरातच्या पराभवामुळे ती सातव्या स्थानावर घसरली आहे.

'या' संघांना बाहेर जाण्याचा खतरा

पॉइंट टेबलमधील शेवटच्या 3 संघांबद्दल बोलायचे झाले तर, आठव्या स्थानावर पंजाब किंग्जचे सध्या 4 गुण आहेत. नवव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सचेही 4 गुण आहेत, पण नेट रन रेटच्या बाबतीत पंजाब (-0.218) मुंबईपेक्षा (-0.234) पुढे आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू शेवटच्या स्थानावर आहे, ज्यांना आतापर्यंत फक्त 2 गुण जमा करता आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT