Team India Squad : 20 खेळाडूंची नावे आली समोर... T20 World Cup मध्ये कोणाला मिळणार संधी?

Team India Squad T20 World Cup 2024 : जून महिन्यात वेस्ट इंडीज व अमेरिका येथे टी-२० विश्‍वकरंडकाचा थरार रंगणार आहे. त्याआधी एक मेपर्यंत संभाव्य संघाची निवड करण्यात यावी, असा आदेश आयसीसीकडून देण्यात आला आहे.
Team India Probable 20 Players Squad for ICC T20 World Cup 2024
Team India Probable 20 Players Squad for ICC T20 World Cup 2024SAKAL

Team India Squad T20 World Cup 2024 : जून महिन्यात वेस्ट इंडीज व अमेरिका येथे टी-२० विश्‍वकरंडकाचा थरार रंगणार आहे. त्याआधी एक मेपर्यंत संभाव्य संघाची निवड करण्यात यावी, असा आदेश आयसीसीकडून देण्यात आला आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्या समितीसमोर भारतीय संघ निवडण्याचे आव्हान असणार आहे.

टी-२० विश्‍वकरंडकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात येईल, असे वाटत नाही. तंदुरुस्त असलेल्या आणि गेल्या वर्षभरात भारतीय संघातून खेळलेल्या क्रिकेटपटूंचीच निवड करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान टीम इंडियाच्या 20 खेळाडूंची नावे समोर आली आहेत. यापैकी 15 खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते आणि 5 खेळाडू स्टँडबाय संघासोबत जाऊ शकतात.

Team India Probable 20 Players Squad for ICC T20 World Cup 2024
Team India Squad For T20 WC24 : विराट कोहली झाला निश्चिंत... हार्दिकच्या निवडीबाबत आली नवी अपडेट

शुभमन गिल व यशस्वी जयस्वाल या दोघांची अंतिम पंधरा जणांच्या चमूत निवड झाल्यास शिवम दुबे व रिंकू सिंग या मधल्या फळीतील एकालाच भारताच्या अंतिम १५ जणांच्या संघात निवडण्यात येईल. तसेच संजू सॅमसन, के. एल. राहुल, रिषभ पंत, इशान किशन, जितेश शर्मा हे खेळाडू यष्टिरक्षणासाठी शर्यतीत आहेत. सध्या तरी राहुल, पंत, सॅमसन यांचे पारडे जड समजले जात आहे.

हार्दिक पंड्याकडून प्रतिमेला साजेशा खेळ आयपीएलमध्ये होत नाही; पण तरीही त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल अशी चिन्ह नाहीत. विराट कोहलीचेही स्थान पक्के समजले जात आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव या फलंदाजांचाही समावेश पक्का आहे. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Team India Probable 20 Players Squad for ICC T20 World Cup 2024
Team India Squad T20 WC : शुभमन गिल अन् यशस्वी जैस्वालचा वर्ल्ड कप संघातून पत्ता कट? लवकरच होणार संघाची घोषणा

कुलदीप, युझवेंद्रची निवड?

फिरकी गोलंदाजीचा विचार करता कुलदीप यादव व युझवेंद्र चहल या फिरकीपटूंना टी-२० विश्‍वकरंडकाचे तिकीट बुक करता येणार आहे. रवी बिश्‍नोई याचे दोघांनाही आव्हान असेल; पण जडेजा व अक्षर या अष्टपैलू खेळाडूंना संधी दिल्यास कुलदीप व युझवेंद्र यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराचे स्थान निश्‍चित आहे. मोहम्मद सिराज, आवेश खान, अर्शदीप सिंग यांना संधी आहे.

Team India Probable 20 Players Squad for ICC T20 World Cup 2024
Team India Squad T20 WC : उपकर्णधाराच्या जागेवर टांगती तलवार! मुंबईच्या पठ्ठ्यामुळे हार्दिक पांड्या संघातून जाणार बाहेर?

भारताचे भविष्य

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात भारतीय क्रिकेट संघाला युवा हरहुन्नरी खेळाडू लाभले. रियान पराग, मयंक यादव, अभिषेक शर्मा, हर्षित राणा, नितीश रेड्डी यांनी यंदा चमकदार खेळ करीत सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित केले आहे; पण बीसीसीआयकडून या युवा खेळाडूंना थेट टी-२० विश्‍वकरंडकाचे तिकीट देण्यात येणार नाही. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंना आधी द्विपक्षीय मालिकांमध्ये संधी दिली जाईल. झिम्बाब्वे व श्रीलंका यांच्याविरुद्धच्या झटपट मालिकांसाठी या युवा खेळाडूंची निवड करण्यात येऊ शकते. हे खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचे भविष्य आहेत.

Team India Probable 20 Players Squad for ICC T20 World Cup 2024
T20 WC Team India Squad : 5 फलंदाज, 3 ऑलराउंडर, 2 स्पिनर्स अन् 2 विकेटकीपर; 'या' 15 जणांना मिळणार वर्ल्ड कपचं तिकीट?

हे खेळाडू शर्यतीत

फलंदाज - रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग.

अष्टपैलू - हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल.

फिरकीपटू - कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवी बिश्‍नोई.

यष्टिरक्षक - रिषभ पंत, के. एल. राहुल, संजू सॅमसन

वेगवान गोलंदाज - जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, आवेश खान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com