IPL Points Table 2023 
IPL

IPL 2023 : चेपॉकवर पराभवाच्या षटकारानंतर अखेर राजस्थानच्या पदरी 15 वर्षांनी पडला विजय

IPL 2023 : राजस्थानचा 'हल्ला बोल' चेन्नईचा पराभव अन् नंबर-1 वर...

Kiran Mahanavar

IPL 2023 : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने शेवटी 2008 मध्ये शेन वॉर्नने जे केले होते तेच केले. 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या होम ग्राउंड चेपॉक स्टेडियमवर पराभूत केले. त्यांच्या फिरकीपटूंच्या जोरावर राजस्थानने चेन्नईचा पराभव करत या मोसमातील तिसरा विजय नोंदवला.

चेन्नईतील बुधवारची संध्याकाळ एमएस धोनी आणि त्याच्या चाहत्यांसाठी एंटी क्लाइमेक्ससारखी होती. चेन्नईचा कर्णधार म्हणून धोनीचा हा 200 वा सामना होता. मैदान हे त्याचे घर देखील होते, जिथे गेल्या 20 हून अधिक सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सशिवाय इतर कोणीही त्याला पराभूत करू शकले नाही. त्यानंतर शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धोनीला षटकार ठोकून सामना जिंकण्याची संधी होती, पण संदीप शर्माच्या उत्कृष्ट यॉर्करने त्याच्याकडून ही संधी हिरावून घेतली.

चेपॉक वर आरआर - सीएसके

  • 2008 - 10 धावांनी विजयी

  • 2010 - 23 धावांनी पराभूत

  • 2011 - 8 गडी राखून पराभूत

  • 2012 - 7 गडी राखून पराभूत

  • 2013 - 5 विकेट्सनी पराभूत

  • 2015 - 12 धावांनी पराभव

  • 2019 - 8 धावांनी पराभूत

  • 2023 - 3 धावांनी विजयी

15 वर्षांनंतर चेपॉक येथे चेन्नईविरुद्ध 3 धावांनी मिळवलेल्या या विजयाने राजस्थान रॉयल्सला गुणतालिकेत अव्वल स्थानावर गेले आहे. लखनौ सुपर जायंट्सनंतर राजस्थान हा दुसरा संघ आहे, ज्याने तीन सामने जिंकले आहेत.

राजस्थान आणि लखनौचे 4-4 सामन्यांत 6-6 गुण आहेत. निव्वळ रन रेटमधील फरकाच्या आधारे राजस्थानने (1.588) लखनौ (1.048) वरून पहिले स्थान पटकावले. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाचा RR सर्व 10 संघांमध्ये सर्वोत्तम आहे.

त्याच वेळी, CSK (0.225) ला देखील गुणतालिकेत शीर्षस्थानी किंवा क्रमांक दोनवर पोहोचण्याची संधी होती, परंतु सध्या ही संधी त्यांच्या हातातून निसटली आहे. धोनीच्या संघाचे 4 सामन्यात 2 विजय आणि 2 पराभवातून केवळ 4 गुण आहेत आणि ते पाचव्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT