Ishan Kishan Injury Chris Jordan  esakal
IPL

Ishan Kishan Injury : जॉर्डनने मुंबईचे केले नुकसान, आपल्याच तडाखेबाज फलंदाजाला केली दुखापत

अनिरुद्ध संकपाळ

Ishan Kishan Injury Chris Jordan : आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरातचा शुभमन गिल मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाला झोडपून काढत होता. गुजरात मुंबईसमोर मोठे आव्हान ठेवणार हे 15 व्या षटकातच स्पष्ट झाले होते. जरी गुजरातने 200 धावांच्या पुढचे आव्हान ठेवले तरी मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात अनेकवेळा 200 च्या पुढचे आव्हान पार केले आहे. त्यामुळे सामन्यात अजून जान होती. मात्र मुंबईचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने स्वतःच्याच टीमचे नुकसान केले. जॉर्डनने हे नुकसान जाणून बुजून केले नाही तर अनावधानाने जॉर्डनकडून किशन दुखापतग्रस्त झाला.

गुजरात फलंदाजी करत असताना 16 व्या षटकात इशान किशनला अचानक ड्रेसिंग रूममध्ये परतावे लागले. त्याचे झालं असं की किशन षटक संपल्यावर दुसऱ्या एन्डला जात होता. त्याचवेळी ख्रिस जॉर्डन त्याला क्रॉस करून पुढे जात होता. मात्र जॉर्डनचे लक्ष नव्हते. याचवेळी जॉर्डनचा टोपी घालताना हात इशान किशनच्या डोळ्याला लागला अने त्याच्या डोळ्याला दुखापत झाली. यानंतर इशान किशनने त्वरित मैदान सोडले. त्याच्या जागी विष्णू विनोदने उर्वरित षटकात मुंबई इंडियन्सतकडून विकेटकिंपिंग केली.

इशान किशनच्या डोळ्याला कितपत दुखापत झाली आहे हे अधिकृतरित्या समजू शकलेले नाही. मात्र इशान किशन रोहित शर्मासोबत सलामीला आला नाही. त्याच्या ऐवजी नेहाल वधेरा रोहितसोबत सलामीला आहे. मुंबईच्या 3 विकेट्स पडल्या तरी इशान किशन फलंदाजी करण्यासाठी आला नव्हता. दरम्यान, कॅमरून ग्रीन देखील फलंदाजी करताना चेंडू लागल्याने दुखापतग्रस्त झाला अन् त्याने मैदान सोडले. मात्र तिलक वर्मा 14 चेंडूत 43 धावांची धाडेकाबाज खेळी केल्यानंतर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर ग्रीन पुन्हा मैदानात आला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT