KL Rahul Strip Club Video esakal
IPL

KL Rahul Strip Club Video : अथिया नवऱ्याला जरा आवर... राहुलचा लंडनच्या स्ट्रीप क्लबमधला 'तो' VIDEO व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul Strip Club Video : आयपीएलचा 16 वा हंगाम जवळपास संपल्यात जमा आहे. उद्या चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम सामना खेळला जाणार आहे. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. संघातील अर्धे खेळाडू आधीच लंडनला पोहचले आहेत. विराट कोहली, मोहम्मद सिराज, उमेश यादव लंडनमध्ये दाखल झाले असून त्यांना केएल राहुलची देखील साथ लाभली आहे.

केएल राहुल जरी भारतीय कसोटी संघाचा सदस्य नसला तरी तो पायाच्या स्नायूवरील शस्त्रक्रियेनंतर लंडनमध्येच थांबला आहे. तेथे तो रिहॅबिलिटेशन करत आहे. दरम्यान, केएल राहुलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो लंडनमधील एका स्ट्रीप क्लब क्लबमध्ये पार्टी करताना दिसतोय. राहुलला लंडनमध्ये पाहून चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. संघात नसतानाही राहुल लंडनमध्ये काय करतोय असा प्रश्न चाहते विचारत आहेत. राहुल आयपीएलदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता.

राहुलचा हा पार्टी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी दुखापतीतून सुखरूप बाहेर येण्यासाठी जास्त प्रयत्न करावे अशी प्रतिक्रिया दिली. राहुल सोबत त्याची पत्नी अथिया शेट्टी देखील लंडनमध्ये आहे. चाहत्यांनी तिला देखील ट्रोल केले.

इंग्लंडमध्ये 2021 मध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिप फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. केन विलियमसनच्या नेतृत्वाखालील संघाने पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात भारताचा 8 विकेट्स राखून पराभव केला होता. त्यावेळी भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहली करत होता. आता कसोटी संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर आली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT