KL Rahul With Mother  Sakal
IPL

KL राहुल म्हणाला; आई 26-27 वर्षे खोटं बोलली

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संघाचा स्टार बॅटर आणि लखनौ संघाचा कर्णधार लोकेश राहुलनं (KL Rahul) आपल्या आईची एक मोठी गोष्ट शेअर केली आहे. गेल्या 26-27 वर्षांपासून माझी आई माझ्यासोबत खोट बोलंत होती, असे त्याने म्हटले आहे. लोकेश राहुलनं आपल्या नावाचा किस्सा एका मुलाखतीमध्ये सांगितला. तो म्हणाला की माझे राहुल नाव हे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या चित्रपटातील पात्रावरुन ठेवल्याचे आई सांगायची. (Shah Rukh Khan's character 'Rahul') मी शाहरुख खानची खूप मोठी चाहती आहे. नव्वदीच्या दशकात शाहरुख 'राहुल' नावाने भूमिका करायचा. त्यावरुनच तुझे नाव राहुल ठेवले, असे आई नेहमी सांगत होती. तिची ही गोष्ट मला खरी देखील वाटायची.

या गोष्टीवर लोकेश राहुलने एका मुलाखतीमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या. तो म्हणाला की, काही वर्षांपूर्वीच आई गेले 26-27 वर्षे माझ्यासोबत खोटं बोलत असल्याचे माझ्या लक्षात आले. आईने सांगितलेली माझ्या नावाची गोष्ट मी एका मित्रासोबत शेअर केली. ती व्यक्ती बॉलिवूडशी खूप जवळची होती. त्या व्यक्तीने मला शाहरूख खानने (Shah Rukh Khan) 'राहुल' नावाचे पात्र 1994 मध्ये साकारल्याची माहिती मिळाली. त्याने मला तुझा जन्म 1992 चा आहे, असा टोमणा मारल्याचा किस्साही लोकेश राहुलनं शेअर केलाय.

यावेळी त्याने आपल्या वडिलांचा किस्साही शेअर केला. वडील सुनील गावसकर यांचे चाहते होते. त्यामुळे त्यांच्या मुलाच्या नावावरुन नावावरुन त्यांना माझे नाव रोहन ठेवायचे होते. पण त्यांनी रेडिओवर रोहनऐवजी राहुल ऐकले आणि ते नाव ठेवले, असेही तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Kolhapur News: माझ्यासाठी भरपूर केलंस, माफ कर’, पत्नीला मेसेज पाठवून संपवलं आयुष्य; सावकाराकडून जाच

SCROLL FOR NEXT