Naveen-ul-Haq Virat Kohli  esakal
IPL

Naveen-ul-Haq Virat Kohli : आय एम सॉरी कोहली... नवीननं खरंच विराटची मागितली माफी? अफगाणी म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

Naveen-ul-Haq Virat Kohli : अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक हा आयपीएलमध्ये त्याच्या गोलंदाजीपेक्षा विराट कोहलीसोबतच्या वादामुळेच जास्त चर्चेत राहिला. आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर नवीन कोणत्याही मैदानावर गेला तरी त्याला विराट... विराट... च्या जयघोषाला सामोरे जावे लागले.

दरम्यान मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जांयट्सचा एलिमिनेटर सामन्यात पराभव केला. त्यानंतर नवीनचे नाव ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले. यावेळी नवीनने विराट कोहलीची माफी मागितल्याची पोस्टही व्हायरल झाली. या पोस्टमध्ये विराट कोहली सर मला माफ करा असा मजकूर लिहिला होता. या पोस्टने सोशलवर धुमाकूळ घातला होता. मात्र नवीनने यावर खुलासा केला आहे. तो म्हणाला की ज्यांना फेक अकाऊंटवरून मेसेज मिळाला आहे त्यांनी तक्रार करावी.

दरम्यान, नवीनने सामना झाल्यावर विराट.. विराट.. जयघोषाद्वारे ट्रोल होण्याबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, 'मला मैदानावर कोणत्याही खेळाडूचे नावाचा जयघोष सुरू असलेला आवडतो. मा ते एन्जॉय करतो. यामुळे मला माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते.'

नवीन पुढे म्हणाला की, 'मी बाहेरच्या आवाजावर लक्ष केंद्रीत करत नाही. मी फक्त माझे क्रिकेट आणि माझ्या प्रगतीकडे लक्ष देतो. प्रेक्षक घोषणाबाजी करत आहेत की नाही या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून तुम्ही तुमचे काम करत असता. ज्या दिवशी तुम्ही संघाकडून खेळताना खराब कामगिरी करता त्यावेळी हेच चाहते तुम्हाला बोलत असतात. मात्र ज्यावेळी तुम्ही चांगली कामगिरी करता त्यावेळी ते तुमच्या नावाचा जयघोष करतात. हा खेळाचाच एक भाग आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT