IPL

IPL 2024 PBKS vs GT : गुजरातनं पराभवाचं काढलं उट्ट; राहुल तेवतियाच्या खेळीमुळं पंजाबचा 3 विकेट्सनी केला पराभव

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 PBKS vs GT Live Score : गुजरातची सावध सुरूवात; गिलमुळं संघ पोहचला अर्धशतक पार

पंजाब किंग्जने 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने सावध सुरूवात केली. वृद्धीमान साहा बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने संघाला 8 षटकात 58 धावांपर्यंत पोहचवलं. गिल नाबाद 34 धावा करून खेळत आहे.

IPL 2024 PBKS vs GT Live Score : साई किशोरचा भेदक मारा; पंजाबची अवस्था झाली खराब

गुजरात टायटन्सचा डावखुरा फिरकी गोलंदाज साई किशोरने 3 षटकात 3 विकेट्स घेत पंजाबची अवस्था 7 बाद 99 धावा अशी केली.

IPL 2024 PBKS vs GT Live Score : पंजाबकडून पॉवर प्लेमध्ये आक्रमक सुरूवात मात्र गुजरातनेही दिले 3 धक्के

पंजाबचे सलामीवीर प्रभसिमरन आणि सॅम करन यांनी 5 षटकात अर्धशतक ठोकत संंघाला चांगली सुरूवात करून दिली. मात्र त्यानंतर राशिद खान मोहित शर्मा आणि नूर अहमदने पाठोपाठ धक्के देत पंजाबची अवस्था 3 बाद 67 धावा अशी केली.

IPL 2024 PBKS vs GT Live Score : पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकली;

पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर धवन अजूनही दुखापतग्रस्त असल्याने तो आजचा सामना देखील खेळणार नाहीये. 2 चेंडूत 3 दाव

IPL 2024 PBKS vs GT Live Score : जाणून घ्या कशी असू शकते दोन्ही संघाची प्लेइंग-11

पंजाब किंग्ज : सॅम करन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, रिले रोसो, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, स्पेसर जॉन्सन, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर.

IPL 2024 Punjab Kings vs Gujarat Titans Live Scorecard Updates :

गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा 3 विकेट्सनी पराभव करत अजून दोन गुणांची कमाई केली. गुजरातकडून राहुल तेवतियाने 18 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या. तर शुभमन गिलने 35 धावांचे योगदान दिलं. साई सुदर्शनने 31 धावा करत कर्णधाराला चांगली साथ दिली. पंजाबकडून हर्षल पटेलने 3 तर लियाम लिव्हिंगस्टोनने 2 विकेट्स घेत गुजरातला टेन्शन दिलं.

आयपीएल 2024 च्या 37 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला 142 धावात रोखले. साई किशोरने 4 विकेट्स घेतल्या तर नूर अहमद आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

पंजाबची अवस्था 7 बाद 99 धावा अशी झाली असताना हरप्रीत ब्रारनं झुंजार खेळी करत 12 चेंडूत 29 धावा चोपल्या. त्यामुळे पंजाबला 140 धावांच्या पुढे जाता आले. पंजाबकडून प्रभसिमरनने सर्वाधिक 35 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Temperature : आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले; दिल्लीत उन्हाचा पारा 52 डिग्रीच्याही वर

Pune Car Crash Case: कल्याणीनगर प्रकरणातील आरोपीला निबंध लिहण्याची शिक्षा देऊन जामीन देणारा कोण? सदस्यांची होणार चौकशी

T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार फायनल? गावसकर, लारा, हेडनसह दिग्गजांनी काय केली भविष्यवाणी, पाहा Video

Manoj Jarange Patil Biopic : 'आम्ही जरांगे' सिनेमाचा टीझर रिलीज ; 'हा' मराठी अभिनेता साकारतोय मनोज जरांगेंची भूमिका

Thane News: बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या आव्हाडवर फौजदार गुन्हा दाखल करा, आनंद परांजपे आक्रमक

SCROLL FOR NEXT