PBKS vs GT Playing 11 IPL 2023 esakal
IPL

PBKS vs GT Playing 11 : पांड्या खेळणार की विश्रांतीच घेणार; पंजाबच्या ताफ्यात दाखल होणार मॅच विनर

अनिरुद्ध संकपाळ

PBKS vs GT Playing 11 IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये आज 18 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना होत आहे. दोन्ही संघांनी आपला मागचा सामना गमावल्यामुळे आज ते विजयासाठी आपले सर्वस्व पणाला लावतील. गेल्या सामन्यात गुजरातला रिंकू सिंहच्या धडाकेबाज खेळीमुळे केकेआरकडून शेवटच्या षटकात मात खावी लागली होती. तर दुसरीकडे होम ग्राऊंडवर खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा 8 विकेट्स राखून पराभव केला होता. या सामन्यात शिखर धवनने दमदार 99 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली होती.

आज पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात दोन्ही संघ आपली गाडी पुन्हा विजयी ट्रॅकवर आणण्याच्या प्रयत्नात असतील. आजच्या सामन्यात दोन्ही संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. गुजरात टायटन्सच्या संघात कर्णधार हार्दिक पांड्याची एन्ट्री होऊ शकते. तसेच रिंकू सिंहकडून सडकून मार खाणाऱ्या यश दयालचा देखी पत्ता कट होऊ शकतो.

दुसरीकडे पंजाब किंग्जच्या संघात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आणि मॅच फिनिशर लिम लिव्हिंगस्टोनची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे पंजाबची मधली फळी अजून मजबूत होईल. गुजरात आणि पंजाब यांच्यातील हेड टू हेड सामन्यांची आकडेवारी पाहिली तर या दोन्ही संघांनी एकमेकांविरूद्ध 2 सामने खेळले आहेत. त्यातील एक सामना पंजाबने तर दुसरा सामना गुजरातने जिंकला आहे.

गुजरातची संभावित प्लेईंग 11 :

शुभमन गिल, वृद्धीमान साहा, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी, यश दयाल

इम्पॅक्ट प्लेअर : जयंत यादव, शिवम मावी, मॅथ्यू वेड, जोशुआ लिटिल, ओडियन स्मिथ

पंजाब किंग्ज संभावित प्लेईंग 11 :

शिखर धवन, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, जितेश शर्मा, शाहरूख खान, सॅम करन, नाथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग

इम्पॅक्ट प्लेअर : सिकंदर रजा, ऋषी धवन, लिम लिव्हिंगस्टोन, मोहित राठी

(Sports Latest News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT