RCB Name Change esakal
IPL

RCB Name Change : गोंधळ केला दूर! अखेर RCB ने नाव बदललं, चाहत्यांची मागणी केली पूर्ण

अनिरुद्ध संकपाळ

RCB Name Change : रॉयल चॅलेंजर बेंगलोरने आज एक मोठा बदल केला आहे. त्यांनी आपल्या नावामध्ये बदल केला असून आता रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे नाव रॉयल चॅलेंजर बंगळुरू असं असणार आहे. यापूर्वीच बेंगलोर शहराचे नाव हे बंगळुरू करण्यात आलं होतं. मात्र आरसीबीने आपल्या नावातील बेंगलोर हे नाव तसच ठेवलं होतं. त्यामुळे आरसीबीच्या नावाबाबत चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण होत होता. अखेर त्यांनी नावातील बेंगलोर काढून बंगळुरू केलं आहे.

बेंगलोर शहराचे 2014 मध्ये नाव अधिकृतरित्या बदलण्यात आलं होतं. बेंगलोरचे नाव बंगळुरू करण्यात आलं होतं. तेव्हापासूनच आरसीबीच्या बंगळुरूमधील चाहत्यांची नाव बदलण्याची मागणी होती. मात्र जवळपास 10 वर्षे आरसीबीने आपले नाव बदलले नव्हते अखेर आरसीबीने 2024 च्या हंगामापूर्वी आपल्या नावत बेंगलोर ऐवजी बंगळुरू असं केलं.

आज आरसीबीने आपले किट, लोगो आणि जर्सीचे अनावरण केलं. यावेळी कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आणि विराट कोहली देखील उपस्थित होते. ड्युप्लेसिसने अनावरणानंतर डीजे एलन वॉकरला नवी जर्सी दिली. यानंतर संपूर्ण आरसीबी संघाला स्टेजवर बोलावण्यात आलं अन् फोटो सेशन झाला.

आरसीबीने गेल्या वर्षी ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला होता. त्यानंतर या वर्षी कर्नाटक आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज आर विनय कुमारचा देखील समावेश करण्यात आला आहे.

आरसीबी आपला आयपीएलमधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जसोबत खेळणार आहे. 22 मार्च रोजी होणाऱ्या या सामन्यानेच आयपीएल 2024 चा नारळ फुटणार आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT