Shikhar Dhawan Father Kicked And Punched Gabbar Video Viral
Shikhar Dhawan Father Kicked And Punched Gabbar Video Viral 
IPL

धक्कादायक! धवनला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; मार खातानाचा Video Viral

Kiran Mahanavar

आयपीएल 2022 मध्ये पंजाब संघ प्रथमच ट्रॉफी जिंकूल अशी आशा होती. परंतु पुन्हा एकदा तीच जुनी गोष्ट झाली. मयंक अग्रवालची टीम पुन्हा एकदा प्लेऑफसाठी पात्र ठरू शकली नाही. यावेळी शिखर धवनही त्याच्या संघात होता. पण त्याच्या कामगिरीत ते सातत्य दिसले नाही. प्लेऑफपूर्वीच आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर धवनने त्याच्या घराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Shikhar Dhawan Father Kicked And Punched Gabbar Video Viral)

शिखर धवनने देखील आयपीएल दरम्यान आपल्या सहकाऱ्यांसोबत अनेक मजेदार व्हिडिओ शेअर केल्या आहे. या व्हिडिओमध्ये शिखर धवनचे वडील त्याला लाथा मारताणा दिसत आहे. धवनने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या मारहाणीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले की, गब्बरसोबत असे का होत आहे.

मात्र, शिखर धवनचे वडील त्याची चेष्टा करत होते. हा मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत शिखर धवनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आमचा संघ बाद फेरीमध्ये पात्र ठरला नाही, त्यामुळे वडिलांनी मला नॉकआउट केले. सोशल मीडियावर शिखर धवनचा हा व्हिडीओ पाहून सर्व चाहते एन्जॉय करत आहेत.

शिखर धवन आयपीएलच्या या हंगामात पंजाबकडून खेळत होता. पंजाबचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही, पण शिखर धवनने पंजाबसाठी चांगली कामगिरी केली. त्याने 14 सामन्यात 38 च्या सरासरीने 460 धावा केल्या. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या चौथ्या क्रमांकावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT