Shubman Gill 3rd Century In IPL 2023 esakal
IPL

Shubman Gill : गिलने ठोकल्या 17 चेंडूत 88 धावा; डेव्हिडचीने ती चूक 99 धावांनी सुधारली मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill 3rd Century In IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामात मुंबई - चेन्नई या एल क्लासिको फायनलची स्वप्ने पाहणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांना शुभमन गिलने मोठा धक्का दिला. त्याने पॉवर प्लेमध्ये नाही तर पॉवर प्लेनंतर मुंबईच्या गोलंदाजींची यथेच्छ धुलाई केली. शुभमन गिलने 49 चेंडूत आपले शतक पूर्ण करत हंगामातील तिसरे शतक ठोकले. 60 चेंडूत 129 धावा चोपल्या. यात 10 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. गिलने चौकार आणि षटकारांनीच 88 धावा केल्या.

मात्र शुभमन गिलचे यंदाच्या हंगामातील तिसरे शतक झालेच नसते. जर टीम डेव्हिडने गिलचा 30 धावांवर झेल सोडला नसता तर सामन्याचे चित्र काही वेगळेच असते. टीम डेव्हिडने आपली ही चूक गिलने 129 धावा केल्यानंतर सुधारली. मात्र तोपर्यंत गुजरात 200 च्या जवळ पोहचला होता. गिल पाठोपाठ साई सुदर्शनने देखील 31 चेंडूत 43 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 13 चेंडूत 28 धावा चोपून गुजरातला 20 षटकात 3 बाद 233 धावांपर्यंत पोहचवले. मुंबईकडून आकाश माधवाल आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

पॉवर प्लेमध्ये गुजरातला 6 षटकात 50 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. त्यानंतर वृद्धामान साहा 18 धावा करून बाद झाला. मात्र सेट झालेल्या शुभमन गिलने दमदार फलंदाजीकरत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने सुदर्शनच्या साथीने गुजरातला 11 षटकात 98 धावांपर्यंत पोहवले.

संघाचे शतक 12 व्या षटकात धावफलकावर लावल्यानंतर शुभमन गिलने आपल्या इनिंगचा 5 वा गिअर टाकला. त्याने गेल्या सामन्यातील स्टार आकाश माधवाल, अनुभवी पियुष चावला यांचा खरपूस समाचार घेत षटकारांची बरसात केली. 12 व्या षटकात 21 आणि 13 व्या षटकात 20 धावा चोपत संघाला 15 व्या षटकात 150 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: झिम्बाब्वेत वैभव सूर्यवंशीची खरी परीक्षा! पहिला सामना कधी, किती वाजता; संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

राहुल गांधींच्या नाकातून रक्तस्त्राव! ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून मारहाण? काँग्रेसची अधिकृत पोस्ट

Live Updates Marathi : CJP च्या आंदोलनाला ममता बॅनर्जींचा पाठिंबा, सरकारविरोधात एकजूट होण्याचं आवाहन

Manchar News : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पुणे जिल्ह्याची दुहेरी बाजी; काळवाडी प्रथम, कडाचीवाडीला पाणी व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात; चर्चेत काय घडलं? सरकारकडून आंदोलकांवर शब्द फिरवल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT