CSK IPL 2023 
IPL

CSK IPL 2023 : पराभवानंतर CSKला आणखी एक मोठा धक्का, स्टार खेळाडू दोन आठवडे बाहेर

दुखापतीमुळे स्टार अष्टपैलू खेळाडू चेन्नई सुपर किंग्जच्या पुढील तीन सामन्यांमधून बाहेर

Kiran Mahanavar

CSK IPL 2023 : आयपीएलच्या या हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला एकामागून एक धक्के बसत आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील पराभवानंतर चेन्नई संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

संघाचा एक स्टार अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जच्या पुढील किमान तीन सामन्यांमधून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान रविचंद्रन अश्विनला झेल घेताना दक्षिण आफ्रिकेचा सिसांडा मगालाला बोटाला दुखापत झाली.

मगालाने रॉयल्सविरुद्ध फक्त दोन षटके टाकली आणि एकही विकेट न घेता 14 धावा दिल्या. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना मगालाच्या दुखापतीबाबत अपडेट विचारण्यात आले.

फ्लेमिंगने पुष्टी केली की मगाला त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे आणि तो पुढील दोन आठवड्यांसाठी बाहेर असेल. चेन्नई सुपर किंग्जचे पुढील दोन आठवड्यात तीन सामने खेळायचे आहेत. 17 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध त्यानंतर 21 एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद आणि 23 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामना खेळायचा आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान स्टीफन फ्लेमिंगने इतर CSK खेळाडूंबद्दल अपडेट देखील दिले. तो म्हणाला की, बेन स्टोक्सवर लक्ष ठेवले जात आहे. तो लवकरच सीएसकेकडून खेळण्यासाठी उपलब्ध होईल. दीपक चहर काही आठवडे मैदानाबाहेर राहणार आहेत.

पुढील सामन्यासाठी 11व्या क्रमांकावर असलेल्या सिसांडा मगालाच्या जागी श्रीलंकेचा मथिशा पाथिराना खेळण्याची शक्यता आहे. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पाथीराना आयपीएल 2023 चा पहिला सामना खेळतो की नाही हे पाहणे मनोरंजक असेल. बेन स्टोक्सही निवडीसाठी उपलब्ध होईल अशी आशा CSK चाहत्यांना असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT