Suryakumar Yadav  esakal
IPL

Suryakumar Yadav IPL 2024: पांड्याची प्रेस, रोहितचे आगमन अन् सूर्याची 'ती' इन्स्टा स्टोरी... का झालं त्याचं हार्ट ब्रेक?

Suryakumar Yadav IPL 2024 : सूर्यकुमार यादवने पुन्हा ठेवली हार्ट ब्रोकन स्टोरी, मुंबईचा धाकड फलंदाज कशामुळे झाला नाराज?

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav Heart Break Story IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नुकतेच आयपीएल 2024 च्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्यावर कॅप्टन्सीवरून प्रश्नांची सबत्ती झाली. त्यानंतर मुंबईने रोहित शर्माच्या आगमनाचा व्हिडिओ शेअर केला. रोहित कधी मुंबई इंडियन्सच्या संघात सामील होणार अशी चर्चा होती. या संपूर्ण घडामोडीत आता सूर्यकुमार यादवच्या नव्या इन्स्टा स्टोरीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला ट्रेड करून आपल्या संघात पुन्हा सामावून घेतलं. याचबरोबर मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार करून सर्व चाहत्यांना एक मोठा धक्का दिला. हा धक्का मुंबईचा 360 डिग्री खेळाडू सूर्यकुमार यादवसाठी देखील बसल्याचं बोललं जातं. कारण त्यावेळी त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर ब्रोकन हार्टचा इमोजी ठेवला होता.

आता पांड्याची मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून पहिली प्रेस झाल्यानंतर देखील सूर्यकुमार यादवने ब्रोकन हार्टचाच इमोजी इन्स्टा स्टोरीवर ठेवला आहे. जोडीला त्याने सिद्धीविनायक मंदिरातील गणपतीच्या मुर्तीचा फोटो अन् हनुमानाच्या मुर्तीचा फोटो देखील स्टोरी म्हणून लावला आहे.

सूर्यकुमारच्या या स्टोरीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. सूर्या सध्या एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन करत आहे. तो घोट्याच्या दुखापतीमुळे अनेक मालिकांना मुकला होता. सूर्या आयपीएलचे पहिले दोन सामने देखील मुकण्याची दाट शक्यता आहे.

सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. जानेवारी महिन्यात त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. टी 20 क्रिकेट रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असणारा सूर्यकुमार सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन करत आहे.

बीसीसीआयने सूर्याच्या दुखापतीवर दिलेल्या माहितीनुसार, 'सूर्याचे रिहॅबिलिटेशन हे योग्य मार्गावर आहे. आयपीएलमध्ये तो नक्कीच खेळेल. मात्र एनसीए स्पोर्ट्स अँड सायन्स मेडिकल टीम त्याला खेळण्यासाठी कधी परवानगी देणार हे अजून स्पष्ट नाहीये. मुंबई त्यांचे पहिले दोन सामने गुजरात टायटन्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्याविरूद्ध खेळणार आहे.'

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT