CSK vs RCB X/ChennaiIPL
IPL

IPL 2024: फॉलोवर्सच्या बाबतीत 'ही' सर्वात गरीब फ्रेंचायजी; जाणून घ्या कोणत्या संघाचा सोशल मीडियामध्ये बोलबाला

IPL 2024 Teams Followers: आयपीएलमधील कोणत्या संघाला सोशल मीडियावर किती फॉलोवर्स आहेत, जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

IPL 2024 Teams Followers: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा आता चारच दिवसांवर येऊन ठेपली आहे. 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे प्रत्येक संघात त्यांच्या खेळाडूंचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. तसेच जोरदार सरावही सुरु झाला आहे. त्याचमुळे चाहत्यांमध्येही आयपीएलच्या या 17 व्या हंगामाची चर्चा सुरू झाली आहे.

आयपीएलमध्ये आता गेल्या तीन वर्षापासून 10 संघ खेळत असल्याने या दहाही संघांचे मोठ्या प्रमाणात चाहते दिसून येतात. अनेकदा सोशल मीडियावर या चाहत्यांमध्ये आपापल्या आवडत्या संघाला पाठिंबा देताना खटेकेही उडतात आणि वादही होतात.

भारतात तरी फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्मपैकी एक आहेत. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरही चाहते आपापल्या आवडत्या संघाला फॉलो करतात.

दरम्यान, सोशल मीडियावर कोणता संघ सर्वात लोकप्रिय आहे, हे माहित आहे का? तर सध्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या तिन्ही प्लॅटफॉर्मवरील फॉलोवर्सची संख्या पाहिली, तर सर्वाधिक फॉलोवर्स हे चेन्नई सुपर किंग्सला आहेत.

पाचवेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्सला फेसबुकवर 13 मिलियन फॉलोवर्स आहेत. इंस्टाग्रामवर 14.2 मिलियन फॉलेवर्स आहेत. याशिवाय ट्विटरवर 10.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. असे मिळून 37.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.

त्यापाठोपाठ मुंबई इंडियन्सला फेसबुकवर 14 मिलियन, तर इंस्टाग्रामवर 12.7 मिलियन आणि ट्वीटरवर 8.2 मिलियन असे मिळून 34.9 मिलियन फॉलोवर्स आहेत. दरम्यान हे दोनच असे संघ आहेत, ज्यांना 30 मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.

त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आहे. त्यांना इंस्टाग्रामवर 12.9 मिलियन फॉलोवर्स आहेत, तर ट्वीटरवर 7 मिलियन आणि फेसबुकवर 10 मिलियन असे मिळून 29.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.

सर्वात कमी फॉलोवर्स लखनऊ सुपर जायंट्लला आहेत, त्यांना तिन्ही प्लॅटफॉर्मवर मिळून 4.5 मिलियन फॉलोवर्सच आहेत.

सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स असलेले संघ (फेसबुक, ट्वीटर आणि इंस्टाग्राम मिळून) (आकडेवारी 19 मार्च 2024 पर्यंत)

  • चेन्नई सुपर किंग्स - 37.5 मिलियन

  • मुंबई इंडियन्स - 34.9 मिलियन

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - 29.9 मिलियन

  • कोलकाता नाईट रायडर्स - 26.8 मिलियन

  • पंजाब किंग्स - 14.9 मिलियन

  • दिल्ली कॅपिटल्स - 14.7 मिलियन

  • राजस्थान रॉयल्स - 11.5 मिलियन

  • सनरायझर्स हैदराबाद - 12.8 मिलियन

  • लखनऊ सुपर जायंट्स - 4.5 मिलियन

  • गुजरात टायटन्स - 5.37 मिलियन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! सहकारी टॅक्सी सेवेसाठी सरकार नवे नियम आणणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले तातडीचे आदेश

Shirur Firing Case : करडे घाटात झालेल्या अंदाधूंद गोळीबार प्रकरणानंतर अलर्ट झालेल्या पोलिस दलाने नामचीन गुंडांची धरपकड केली सुरू

Mumbai: पूरमुक्त मुंबई करणार म्हणणाऱ्या BMCला पहिल्याच पावसात धप्पा, अंधेरी सबवे पाण्यात, VIDEO VIRAL

Panhala Tourism Tax : पन्हाळागडावर पर्यटकांची उघड लूट? पर्यटन कराच्या नावाखाली वर्षाकाठी 5 ते 7 लाखांचा घोळ; 'या' गोष्टीमुळे संशय वाढला!

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा मोठा प्लॅन! तब्बल 4,500 बसेस धावणार, दररोज 33 लाख भाविक करणार प्रवास

SCROLL FOR NEXT