IPL 2024 : अंतर राखूनच....! मुंबईच्या व्हिडिओमध्ये रोहित अन् हार्दिकमधील 'ती' जागा सांगून गेली सर्व काही

Hardik Pandya And Rohit Sharma News : इंडियन प्रीमियर लीगचा थरार सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
Hardik Pandya And Rohit Sharma Sit Faraway From Each Other In A Video By mumbai Indians
Hardik Pandya And Rohit Sharma Sit Faraway From Each Other In A Video By mumbai Indianssakal

Hardik Pandya And Rohit Sharma News : इंडियन प्रीमियर लीगचा थरार सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूसोबत नीता अंबानी आणि मेंटर सचिन तेंडुलकर दिसत आहेत.

व्हिडिओच्या शेवटच्या काही सेकंदासाठी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत एका सोफ्यावर बसलेले दिसत आहे. रोहितच्या जागी हार्दिकला कर्णधार बनवण्याच्या वादानंतर सोशल मीडिया युजर्समध्ये याबद्दल प्रचंड नाराजी आहे. आता या व्हिडिओमध्ये चाहत्यांना असे काही दिसले ज्यामुळे त्यांना चर्चेचा विषय मिळाला आहे. याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Hardik Pandya And Rohit Sharma Sit Faraway From Each Other In A Video By mumbai Indians
IPL 2024 : ट्रेनिंग सेशनमध्ये किंग कोहलीचा दिसला नवा अवतार, फलंदाजी सोडून करत होता 'हे' काम, Video Viral

आयपीएलला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होत आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सची पत्रकार परिषद काल झाली. ज्यामध्ये पांड्या म्हणाला की, रोहित शर्मा हा टीम इंडियाचा कर्णधार आहे, त्याच्या नेतृत्वाखाली मी खेळलेलो आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये मी त्याच्याऐवजी नेतृत्व करणार असलो तरी आमच्या नात्यात कोणतीही दुरावा नाही आणि मला विश्वास आहे की भारतीय कर्णधार त्याच्या अनुभवाचा उपयोग करेल आणि संपूर्ण हंगामातम मला साथ देईल.

Hardik Pandya And Rohit Sharma Sit Faraway From Each Other In A Video By mumbai Indians
IPL 2024 च्या तीन दिवस आधी मुंबईच्या संघात मोठा बदल! 'या' स्टार खेळाडूची अचानक ताफ्यात एन्ट्री

मुंबईचा नवा कर्णधार पांड्या पुढे म्हणाला की, मुंबई इंडियन्सला रोहित शर्माने आत्तापर्यंत जे यश मिळवून दिले तेच मला पुढे न्यायचे आहे, त्यामुळे रोहित मदतीला पुढे असेलच. त्यामुळे ते विचित्र किंवा वेगळे असेल असे मला वाटत नाही. मी माझी संपूर्ण कारकीर्द त्याच्या कर्णधारपदाखाली खेळली आहे आणि हो मला माहित आहे की संपूर्ण हंगामात तो नेहमीच माझ्या खांद्यावर असेल.

Hardik Pandya And Rohit Sharma Sit Faraway From Each Other In A Video By mumbai Indians
IPL 2024 पूर्वी BCCI चा मोठा निर्णय! केंद्रीय करारात केला मोठे बदल, 'या' दोन खेळाडूंची झाली एन्ट्री

कर्णधार बदलानंतर नाराज झालेल्या चाहत्यांबाबतही हार्दिकने वक्तव्य केले असून त्यांच्याकडूनही पाठिंबा आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला की, 'हो, मी गोलंदाजी करणार आहे. खरे सांगायचे तर, आम्ही चाहत्यांचा खूप आदर करतो, परंतु त्याच वेळी आम्हाला आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ज्या गोष्टी नियंत्रणात राहतात त्या मी नियंत्रित करतो. मी जे नियंत्रित करू शकत नाही त्यावर मी लक्ष केंद्रित करत नाही आणि त्याच वेळी आम्ही चाहत्यांचे आभारी आहोत. त्याच्यामुळेच आपले नाव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com