FIFA World Cup 2022 Iran Football Team National Anthem Controversy esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : इराणच्या संघाने स्वतःच्याच देशाचे राष्ट्रगीत म्हणण्यास का दिला नकार?

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup 2022 Iran Football Team National Anthem Controversy : फिफा वर्ल्डकपमधील ग्रुप B च्या पहिला सामना इंग्लंड आणि इराण यांच्यात झाला. हा सामना सुरू होण्यापूर्वीच वादग्रस्त ठरला. इराणच्या फुटबॉल संघाने आपल्याच देशाचे राष्ट्रगीत म्हणण्यास नकार देत देशात सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. ज्यावेळी खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये इराणचे राष्ट्रगीत सुरू झाले त्यावेळी इराणचे खेळाडू चिंताग्रस्त चेहऱ्याने शांत उभे राहिले.

इराण हा गेल्या दोन महिन्यापासून देशांतर्गत आंदोलनाने पार हादरून गेला आहे. 16 सप्टेंबरला इराणच्या कुर्दिश वंशाच्या 22 वर्षीय माशा अमिनीचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला होता. यानंतर इराणमध्ये आंदोलने सुरू आहेत. अमिनीला इस्लामिक रिपब्लिकच्या महिलांसाठीच्या ड्रेस कोडचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या ड्रेसकोडमध्ये हिजाब घालण्याची सक्ती आहे.

दरम्यान, या घटनेचा निषेध म्हणून काही इराणी खेळाडूंनी राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिला. याचबरोबर आंदोलनाला पाठिंबा म्हणून या खेळाडूंनी विजय साजरा करण्यास देखील त्यांनी नकार दिला आहे. अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमधील आंदोलनात जवळपास 400 लोकांचा मृत्यू झाला असल्याच्या दावा इराणमधील मानवाधिकार संघटनांनी केला आहे. दरम्यान, संघातील खेळाडूंच्या या कृतीमुळे इराणचा संघ हा इराणचे प्रतिनिधित्व करतोय की 1979 पासून सत्तेत असलेल्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनचे प्रतिनिधित्व करतोय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फिफा वर्ल्डकप 2022 मधील ग्रुप B च्या सामन्यात बलाढ्य इंग्लंडने इराणचा 6 - 2 अशा मोठ्या गोलफरकाने पराभव केला. हॅरी केनच्या नेतृत्वातील इंंग्लंडला संभाव्य विजेत्यांमध्ये गणले जाते. इंग्लंडने कतारमधील वर्ल्डकपची धाडाकेबाज सुरूवात करून आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला. इंग्लंडकडून बुकायो साकाने दोन गोल केले तर रहीम स्टेर्लिंग, ज्यूड बेलिंगहम, मार्कस रॅशफोर्ड आणि जॅक ग्रिलीशने प्रत्येकी 1 गोल केला. इराणकडून मेहदी तारेमीने 2 गोल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishna River Flood : कोल्हापूर-सांगलीत मुसळधार! नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरात पूरस्थिती; पाहा यंदाचा पहिला 'दक्षिण द्वार सोहळा', भाविकांची अलोट गर्दी

IND vs ENG, 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचा फलंदाजी क्रमांक बदलणार, तर बिश्नोई संघातून आऊट? कशी असू शकते भारताची प्लेइंग-११

Pune Solapur Highway: २१ कोटींचा रस्ता पुन्हा उखडला! पालखीला अवघे तीन दिवस; पुणे-सोलापूर महामार्गावर खडी, खड्डे अन् अपघातांचा धोका..

Latest Marathi News Update : खडकवासला ८१ टक्के भरले, मुठा उजव्या कालव्यातून विसर्ग सुरू

Pune Water: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खडकवासला धरणसाखळीत अवघ्या १३ तासांत २.३६ टीएमसीची भर, वेगाने वाढतोय जलसाठा

SCROLL FOR NEXT