हॉट अश्विनीनं श्रेयस अय्यरला केलं 'हिट' विकेट! सूर्याचा उल्लेख करत हे काय म्हणाली सुंदरा? | Shreyas Iyer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas Iyer Ashweenee Aher

Shreyas Iyer : हॉट अश्विनीनं श्रेयस अय्यरला केलं 'हिट' विकेट! सूर्याचा उल्लेख करत हे काय म्हणाली सुंदरा?

Shreyas Iyer Ashweenee Aher : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवने तुफानी फलंदाजी करत नाबाद 111 धावांची दमदार खेळी केली. त्याने एका वर्षात टी 20 क्रिकेटमधील आपले दुसरे शतक ठोकले. सूर्यासारखी 360 डिग्री फलंदाजी आता प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, याच सामन्यात श्रेयस अय्यरने देखील एक षटकार आणि एक चौकार मारत चांगली सुरूवात केली होती. मात्र तो 13 धावांवर असताना हिटविकेट झाला. याचाच संदर्भ घेत मॉडेल आणि अभिनेत्री अश्विनी अहेरने अय्यरला थेट कॉफीचीच ऑफर दिली.

हेही वाचा: Dinesh Karthik : तमिळनाडूने वनडेत 506 धावा चोपल्या तरी कार्तिक का आहे नाखूष?

अश्विनीने आपल्या सोशल मीडियावर एक स्टेटस ठेवला होता. या स्टेटसमध्ये ती म्हणते की, 'श्रेयसने जर सामन्यापूर्वी माझ्यासोबत जर कॉफी पिली असती तर त्याने देखील सूर्यकुमार यादव सारखी सेंच्युरी मारली असती.' या स्टेटसद्वारे अश्विनीने थेट अय्यरला कॉफीचीच ऑफर दिली आहे. अश्विनी अहेरने श्रेयस अय्यर हिट विकेट झाल्यानंतर त्याला टोला लगावला आहे.

दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर 191 धावांचे आव्हान ठेवले होते. सूर्यकुमार यादवने 52 चेंडूत नाबाद 111 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करत न्यूझीलंडला 126 धावात रोखले. हुड्डाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून केन विलियम्सनने सर्वाधिक 61 धावा केल्या. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. उद्या (दि.22) मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होणार असून हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न असले.

हेही वचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....