Lakshya Sen All England Open semi-final Marathi News sakal
क्रीडा

All England Open : लक्ष्य सेनने थाटात सेमीफायनलमध्ये मारली एट्री! 71 मिनिटांत माजी विजेत्याला चारली पराभवाची धूळ

Lakshya Sen All England Open Badminton : भारताचा युवा स्टार शटलर लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमधील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या माजी चॅम्पियन ली जी झीचा रोमांचक सामन्यात पराभव केला.

Kiran Mahanavar

Lakshya Sen All England Open Badminton : भारताचा युवा स्टार शटलर लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमधील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या माजी चॅम्पियन ली जी झीचा रोमांचक सामन्यात पराभव केला. आणि थाटात सेमीफायनलमध्ये एट्री मारली. 22 वर्षीय लक्ष्य सेनने पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन केले आणि 71 मिनिटांत सामना जिंकून अंतिम-4 मध्ये मारली मारली.

22 वर्षीय लक्ष्य सेनने उपांत्यपूर्व फेरीत झीचा 20-22, 21-16, 21-19 असा पराभव केला. सेमीफायनलमध्ये जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानी असलेल्या लक्ष्य सेनचा सामना जागतिक क्रमवारीत 9व्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीशी होणार आहे.

लक्ष्य सेन आणि ली जी झी यांच्यातील सामना सुरुवातीपासूनच रोमहर्षक पाहिला मिळाला. लीने नेटमध्ये अनेक चुका केल्याने सेनने पहिल्या गेममध्ये 8-3 अशी आघाडी घेतली. परंतु लीने जोरदार पुनरागमन करत गुणसंख्या 12-12 अशी बरोबरी केली. त्यानंतर दोघांमधील सामना 20-20 असा बरोबरीत सुटला. मलेशियाच्या शटलरने पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये सेनने 11-9 अशी आघाडी घेतली आणि नंतर सात गुण मिळवण्यासाठी आपला वेग वाढवला आणि उत्कृष्ट पुनरागमन करत विजयाची नोंद केली. शेवटच्या गेममध्ये सेनने ब्रेकमध्ये 11-8 अशी आघाडी घेतली. आणि सेनने आपली आघाडी जाऊ दिली नाही. मात्र, लीने सलग चार गुण मिळवत गुणसंख्या 15-19 अशी नेली, परंतु त्यानंतर भारतीय शटलरने दोन महत्त्वपूर्ण गुण मिळवत चौथ्यांदा मलेशियाच्या शटलरचा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT