BCCIने आखला मोठा डाव! IPL पुन्हा होणार भारताबाहेर, 'या' देशात रंगणार दुसऱ्या टप्पाचा थरार?

IPL 2024 2nd Half in Dubai To Lok Sabha Elections : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. यावेळी ही लीग 2 टप्पात खेळली जाणार आहे, त्यातील पहिला भाग 7 एप्रिलपर्यंत खेळला जाईल.
BCCI Organizing IPL 2024 2nd Half in Dubai To Lok Sabha Elections Marathi News
BCCI Organizing IPL 2024 2nd Half in Dubai To Lok Sabha Elections Marathi Newssakal

IPL 2024 2nd Half in Dubai To Lok Sabha Elections : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. यावेळी ही लीग 2 टप्पात खेळली जाणार आहे, त्यातील पहिला भाग 7 एप्रिलपर्यंत खेळला जाईल. दरम्यान, आता एक मोठी बातमी येते की, आयपीएल 2024 चा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये खेळला जाऊ शकतो.

देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) हा निर्णय घ्यावा लागू शकतो, असे मानले जात आहे.

BCCI Organizing IPL 2024 2nd Half in Dubai To Lok Sabha Elections Marathi News
WPL 2024: शेवटच्या बॉलवर मुंबई इंडियन्सचा पराभव, शोभनाचं सेलिब्रेशन अन् चाहत्यांना झाली सूर्याची आठवण, Video व्हायरल

एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, "भारतीय निवडणूक आयोग शनिवारी दुपारी तीन वाजता निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतर आयपीएलचे सामने दुबईला हलवायचे की नाही याचा निर्णय बोर्ड घेईल. सध्या बीसीसीआयचे काही अधिकारी तेथे आहेत. दरम्यान, काही संघांनी त्यांच्या खेळाडूंकडून पासपोर्टही मागितल्याचे वृत्त आहे.

BCCI Organizing IPL 2024 2nd Half in Dubai To Lok Sabha Elections Marathi News
IPL 2024 : चेन्नईमध्ये 'या' वर्ष मोठे बदल होणार... काय आहे धोनीचा प्लॅन? CSKचा दिग्गज खेळाडू स्पष्टच बोला

निवडणुकीमुळे आयपीएलच्या या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे. यापूर्वीही मंडळाला अशाच आव्हानांचा सामना करावा लागला होता. IPL दरम्यान 2009, 2014 आणि 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी 2009 मध्ये ही स्पर्धा संपूर्णपणे दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आली होती. तर 2014 मध्ये पहिला टप्पा भारतात आणि दुसरा टप्पा UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता. आणि आयपीएल 2019 निवडणुका असून पण संपूर्ण स्पर्धा भारतात खेळली गेली होती.

BCCI Organizing IPL 2024 2nd Half in Dubai To Lok Sabha Elections Marathi News
WPL 2024 : 'मी आऊट झाल्यानंतर...' पराभवानंतर हरमनप्रीतने सांगितले कुठे झाली चूक

2020 मध्ये भारताबाहेर या लीगचे शेवटचे आयोजन करण्यात आले होते. आयपीएल 2020 कोरोना विषाणूच्या संसर्गादरम्यान यूएईमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्या हंगामात मुंबई इंडियन्सने (MI) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात MI ने दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 5 गडी राखून पराभव केला. हा विजेतेपदाचा सामना 10 नोव्हेंबर रोजी दुबईच्या मैदानावर खेळला गेला.

पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात 22 मार्च रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने होणार आहेत. दरवेळेप्रमाणेच यावेळीही अनेक मोठी नावे लीगमध्ये सहभागी होताना दिसणार आहेत. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com