lionel messi assam connection Assam congress mp abdul khaleque tweet fifa world cup final 2022  
क्रीडा

Lionel Messi : मेस्सीचा जन्म आसाममध्ये, कॉंग्रेस खासदारानं तोडले अकलेचे तारे

सकाळ डिजिटल टीम

फिफा विश्वचषक 2022च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने फ्रान्सविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला आहे. हा सामना जगभरातील कोट्यावधी चाहत्यांनी पाहिला. अर्जेंटिनाने शूटआऊटमध्ये 4-2 असा विजय मिळवत लिओनेल मेस्सीचे वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केले. यादरम्यान आसामच्या एका कॉंग्रेस खासदाराने मेस्सीचे अभिनंदन करत त्याचं आसाम कनेक्शन असल्याचं म्हटलं आहे.

काल फ्रान्सविरुद्ध फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर आसाममधील काँग्रेस खासदार अब्दुल खलेक) Congress MP Abdul Khaleque) अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीचे पहिल्यांदा अभिनंदन केलंआणि नंतर त्याचे आसामशी नाते असल्याबद्दल त्याचं कौतुक देखील केलं

"मनापासून अभिनंदन. तुमच्या आसाम कनेक्शनबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे," असं ट्वीट काँग्रेस खासदार अब्दुल खलेक यांनी ट्विट केलं. या ट्विटनंतर वापरकर्त्यांकडून याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.

यादरम्यान खासदाराच्या या दाव्याने हैराण झालेल्या आदित्य शर्मा या ट्विटर यूजरने ट्विट करत खासदारांना "आसाम कनेक्शन?" असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी "हो, तो आसाममध्ये जन्मला आहे" असं उत्तर दिलं. तसेच याबाबत इतरही ट्विटर वापरकर्त्यांकडून प्रश्न विचारले जाऊ लागताच कॉंग्रेस खासदारांनी हे ट्विट डिलीट केले. काँग्रेस खासदाराने केलेले मूळ ट्विट ज्यावर शर्मा यांनी लिओनेल मेस्सीच्या "आसाम कनेक्शन" बद्दल प्रश्न विचारला होता, ते ट्विट खासदारांनी डिलीट केल्याचे दाखवत आहे.

lionel messi assam connection Assam congress mp abdul khaleque tweet fifa world cup final 2022

त्यानंतर या खासदारांनी “अफवा पसरवण्याआधी, मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी माझ्या ट्विटर हँडलची आणि अधिकृत फेसबुक पेजची टाइमलाइन तपासावी,” असे ट्विट त्यांनी केले. मात्र, तोपर्यंत अनेकांनी त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट घेतले होते.

कतारमध्ये विश्वचषक फायनलमध्ये फ्रान्सवर मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी लाखो लोक मायदेशात रस्त्यावर उतरले होते. अर्जेंटीना देशात वर्ल्डकप विजयाचा प्रचंड जल्लोष पाहायला मिळाला. यासोबतच जगभरात देखील संघाच्या चाहत्यांनी विजयाचा आनंद साजरा केल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT