Viral Video : वेन रूनी देखील शाहरूखच्या प्रेमात! 'किंग खान'ने शिकवली खास स्टेप

fifa world cup 2022 shah rukh khan wayne rooney pathaan gave ddlj pose watch viral video
fifa world cup 2022 shah rukh khan wayne rooney pathaan gave ddlj pose watch viral video

शाहरुख खानचा पठाण चित्रपट मागच्या काही दिवसांपासून वादात सापडला आहे. यादरम्यान फिफा विश्वचषक २०२२ च्या फायनलचा आनंद लुटण्यासाठी शाहरूख कतारला पोहोचला होता. त्याने वर्ल्डकप फायनलपूर्वी 'पठाण' त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन देखील केले.

शाहरूखने इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू वेन रुनीसोबत 'पठाण'बद्दल चर्चा देखील केली. या शोमधील शाहरूख आणि वेन रूनी यांचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हयरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख आणि रुनी हे दोघे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (DDLJ) चित्रपटातील ती आयकॉनीक पोझ देताना दिसत आहेत. या व्हिडीओचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शनिवारी शाहरुख खानला ट्विटरवर विचारण्यात आले होते की फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये तो कोणत्या संघाला सपोर्ट करणार आहे. यावर शाहरूखने उत्तर दिले होते की, 'अरे यार दिल कहते है मेस्सी? पण एमबाप्पेला मैदानात पाहणे म्हणजे एक मेजवानी असते.

सध्या शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून वाद सुरू आहे. 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे दीपिका ही अनेक संघटनांच्या निशाण्यावर आहे. सर्व वादांच्या दरम्यान, FIFA विश्वचषक 2022 चा फायनल पाहण्यासाठी ती पोहचली आहे. या कार्यक्रमातील दीपिकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

12 डिसेंबर रोजी पठाण चित्रपटाचे पहिले गाणे बेशरम रंग रिलीज झाले. हे गाणे काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. गाण्यातील दीपिकाच्या परफॉर्मन्सने चाहत्यांना भुरळ घातली. पण म्युझिक व्हिडिओच्या एका सीनमध्ये दीपिका पदुकोण भगव्या रंगाची बिकिनी घातलेली दिसली. भगव्या रंगाची बिकिनी घालून दीपिकाने त्यांच्या भावना दुखावल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. यावरून तिला ट्रोल करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com