ajinkya rahane  Twitter
क्रीडा

"अजिंक्य रहाणे टीम इंडियाची डोकेदुखी; त्याला बाहेर बसवा"

त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत असताना इंग्लंडच्या माजी कर्णधाराने थेट त्याला बाहेर बसवण्याची गोष्ट केली आहे.

सुशांत जाधव

England vs India, 3rd Test : लॉर्ड्सच्या मैदानात टीम इंडियाने दाखवलेला दिमाखदार तोरा लीड्सच्या कसोटीत दिसला नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमानांनी टीम इंडियाला धावांसह डावाने पराभूत केले. या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात एकाही फलंदाजाला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. मध्यफळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पुन्हा एकदा आपल्यातील क्षमता सिद्ध करण्यास अपयशी ठरला. दोन्ही डावात मिळून त्याने केवळ 28 धावा केल्या. त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत असताना इंग्लंडच्या माजी कर्णधाराने थेट त्याला बाहेर बसवण्याची गोष्ट केली आहे.

'क्रिकबझ'च्या कार्यक्रमात मायकल वॉन म्हणाला की, अजिंक्य रहाणेची खराब कामगिरी टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी ठरतीये. इंग्लंडने ज्याप्रमाणे जॅक क्राउली आणि डॉमिनिक सिब्लेला बाहेरचा रस्ता दाखवला त्याप्रमाणेच टीम इंडियाने अजिंक्य राहणेलाही बाकावर बसवायला हवे, असे मत वॉनने व्यक्त केले आहे. अजिंक्य रहाणेनं आंतरराष्ट्रीय कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली होती. मेलबर्नमधील या शतकानंतर त्याच्या भात्यातून धावाच निघलेल्या नाहीत. तीन कसोटी सामन्यात रहाणेनं एकमेव अर्धशतक झळकावले आहे.

कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेसोबतच कर्णधार विराट कोहली देखील इंग्लंड दौऱ्यावर धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय. नोव्हेंबर 2019 मध्ये विराट कोहलीने अखेरचे शतक झळकावले होते. त्यानंतर त्याला मोठी खेळी करण्यात अपयश येताना दिसते.

लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात टीम इंडियाला 76 धावा आणि डावाने पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाला दुहेरी आकडाही पार करता आला नव्हता. भारताचा पहिला डाव अवघ्या 78 धावांत आटोपला होता. त्यानंतर इंग्लंडने 432 धावा करत मोठी आघाडी घेतली. यात ज्यो रुटच्या शतकासह आघाडीच्या तिघांच्या अर्धशतकाचा समावेश होता. 354 धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना भारतीय संघाचा दुसरा डाव 278 धावांत आटोपला. इंग्लंडने पिछाडीवरुन मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT