mohammad-rizwan-offering-namaz-america-road-video-viral cricket news in marathi kgm00 
क्रीडा

Mohammad Rizwan : पाकिस्तानी क्रिकेटरने अमेरिकेत रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली अन् केलं असं काही..., Viral video

Kiran Mahanavar

Mohammad Rizwan Video : पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो रस्त्याच्या कडेला नमाज अदा करताना दिसत आहे. मोहम्मद रिझवानने आपल्या धर्माचे खूप पालन करतो हे सर्वज्ञात आहे. तो कुठेही नमाज अदा करण्यास मागेपुढे पाहत नाही. मैदान असो वा रस्ता, तो नमाज अदा करतो. आता असेच काहीसे अमेरिकेतील रस्त्यांवर पाहायला मिळाले आहे.

सध्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान अमेरिकेत आहेत. हे दोन्ही खेळाडू हार्वर्ड विद्यापीठाच्या एका शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तेथे गेले आहेत. जिथे रिजवानने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि फूटपाथच्या बाजूला कापड पसरूनच नमाज अदा केली. रिझवानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही चाहते रिझवानचे कौतुक करत आहेत. त्यामुळे काही लोक त्याला ट्रोलही करत आहेत.

रिझवानची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

रिझवानने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 27 कसोटी, 57 एकदिवसीय आणि 85 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 38 च्या सरासरीने 1373 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 शतके आणि 7 अर्धशतके झळकली आहेत.

एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 2 शतके आणि 9 अर्धशतकांसह 34 च्या सरासरीने 1408 धावा केल्या आहेत. तर टी-20 मध्ये त्याने 49.1 च्या सरासरीने 2797 धावा केल्या आहेत. रिझवानचे टी-20 मध्ये 1 शतक आणि 25 अर्धशतके आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''होर्मुझ' आता आम्ही चालवणार'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान, अनेक देशांकडून टोल वसुली करण्याचा मनोदय

Pick Up Scooty Accident : भरधाव पिकअपची स्कुटीला धडक; खिर्डी येथील तरुणाचा मृत्यू, एक जखमी

Pune Crime : बोपदेव घाट अत्याचार प्रकरण; आरोपी घाटात आल्यापासून ते कोणत्या मार्गाने पळून गेल्याची साक्ष नोंदवली

Khamgaon News : खामगावात पॅथॉलॉजीस्‍ट डॉक्‍टरचा संशयास्‍पद मृत्‍यू; शरीरावर आढळल्या जखमा

Manchar Accident : वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काळाचा घाला; एसटीच्या धडकेत अकरावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT