Neeraj Chopra races ahead of Usain Bolt 
क्रीडा

Neeraj Chopra : गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम, महान धावपटू उसेन बोल्टला टाकलं मागे

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने 'या' बाबतीत उसैन बोल्टलाही टाकलं मागे

Kiran Mahanavar

Neeraj Chopra : ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने टोकियो गेम्समध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर दिग्गज उसेन बोल्टला 'सर्वात दृश्यमान अॅथलीट' म्हणून मागे टाकले आहे, असे जागतिक अॅथलेटिक्सच्या अभ्यासात दिसून आले आहे. भारताच्या 24 वर्षीय स्टार खेळाडूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकून आपली कीर्ती आणखी वाढवली आहे.

मीडिया कव्हरेजचा विचार करता, नीरज चोप्रांवर 812 लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ इलेन थॉम्पसन-हेरा (751), शेली-अॅन फ्रेझर-प्रायस (698) आणि शेरीका जॅक्सन (679) हे त्रिकुट दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर आहे. करिश्माई बोल्ट 574 लेखांसह या यादीत पाचव्या स्थानावर आहे. जमैकाचा अॅथलीट आता निवृत्त झाला आहे, पण वर्षानुवर्षे अॅथलीटच्या या वार्षिक यादीत तो अव्वल स्थानावर होता.

नीरज चोप्रा या वर्षी डायमंड लीग फायनल जिंकणारा भारतातील पहिला अॅथलीट बनला आहे. भालाफेक स्टारने या वर्षाच्या सुरुवातीला स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 मीटरचा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोही केला होता. हा फेक सध्याचा राष्ट्रीय विक्रमही आहे. दुखापतीमुळे नीरज 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुलमध्ये सहभागी होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT